वाळूमाफियांशी साटेलोटे; तीन शासकीय कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Sand Mafia
Sand Mafia

पाटोदा : वाळूमाफियांशी साटेलोटे करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पाटोदा तहसिल कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांसह दोन ट्रॅक्टर चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार रुपा चित्रक यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये कारकून, तलाठी आणि कोतवालाचा समावेश आहे. 

पाटोदा तालुक्यातील गौण खनिजाची चोरी करून त्याची अनधिकृतपणे सर्रास विक्री केली जात होती. काही महिन्यांपूर्वी अवैध वाळू उपसा करणारी सर्व वाहने ताब्यात घेतली होती. यानंतर महसूल प्रशासनाने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली होती. प्रशासनाकडून दंड वसूल करण्यात आल्याचे पत्र महसूल विभागाकडून पाटोदा पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी ती सर्व वाहने परत दिली.

मात्र, अव्वल कारकून वैशाली पोले, तलाठी वैभव देशपांडे, कोतवाल राहुल गिरी यांनी खोटे दस्तावेज तयार केले. त्यानंतर ट्रॅक्टरचालक लहू रामभाऊ गुंड, संभाजी लहू गुंड यांच्याशी संगनमत केले. त्यांना आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम शासन खाती जमा न करता शासनाची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी वरील पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सिद्धार्थ माने करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com