सुपारी किलर इम्रान मेहंदीसह 8 जणांना जन्मठेप 

सुषेन जाधव 
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा रॉक्‍सी टॉकीजचे मालक सलीम कुरेशी यांचे अपहरण करुन निर्घृण खून करत पुरावा नष्ट करणाऱ्या सिरीयल किलर इम्रान मेहंदीसह आठ जणांना मोक्काचे विशेष न्यायधीश व्ही. व्ही. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकांना 15 लाख 11 हजार रुपये एक कोटी वीस लाख 88 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. 

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा रॉक्‍सी टॉकीजचे मालक सलीम कुरेशी यांचे अपहरण करुन निर्घृण खून करत पुरावा नष्ट करणाऱ्या सिरीयल किलर इम्रान मेहंदीसह आठ जणांना मोक्काचे विशेष न्यायधीश व्ही. व्ही. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकांना 15 लाख 11 हजार रुपये एक कोटी वीस लाख 88 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. 

4 मार्च 2012 रोजी कुरेशी हे टॉकीजवरून रात्री घरी जाण्यासाठी कार (क्र.एम. एच. 20 बीसी 6356) ने निघाले. शहरातील टाऊन हॉल उड्डाणपुलाजवळ पोहचल्यावर त्यांची कार अडवून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. शोध घेऊनही कुरेशी न सापडल्याने त्यांचा भाऊ हलीम कुरेशी यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. 

10 मार्च ला तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त संदीप भाजीभाकरे यांच्या पथकाने कुरेशींचा निघृण खून करणाऱ्या इम्रान मेहंदी ऊर्फ दिलावर शेख नसीर, नुमान खान अब्दुल कय्युम, महमद अश्‍पाक ऊर्फ अशु अजम खान (तिघेही रा. आसेफिया कॉलनी), सय्यद नाजेर सय्यद नासेर अली (कांसबरी नगर), शेख इम्रान ऊर्फ सुलतान सौफोद्दीन शेख (कोरखैरानी ह.मु. कटकटगेट), सय्यद जहीर ऊर्फ शेरा बाखर कुरेशी (चेलीपूरा), जुबेर खान शबीर खान (कैसर कॉलनी), हबीब खालेद हबीब महदम (युनूस कॉलनी), महमद शोयब मोहमद सादीक (बाबर कॉलनी), फरीदखान फेरोज खान (शहा नगर बीडबायापास), शेख हसन शेख हुसेन (शरिफ कॉलनी) या आकरा जणांना अटक केली. या आकरा जणांनी 11 मार्च रोजी पंचासमक्ष सलीम कुरेशीला गळ्याइतक्‍या खोल खड्ड्यात गाडले, डोक्‍यावर (मुंडक्‍यावर) ठेवले आणि त्याचा गळा चिरून निघृण खून केल्याची कबुली दिली. 
 
61 साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या 

इम्रान मेहंदी खून खटल्याची अंतिम सुनावणी मोक्काचे विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या समोर झाली असता मोक्काचे विशेष सरकारी वकील राजेंद्र मुगदीया यांनी 61 साक्षीदार तपासले असून यामध्ये 11 साक्षीदार फितूर झाले होते. 

या 8 जणांना ठोठावली जन्मठेप 

न्यायालयाने इम्रान मेहंदी, सय्यद नाजेर, शेख इम्रान ऊर्फ सुलतान, सय्यद जहीर ऊर्फ शेरा, नुमान खान, जुबेर खान, हबीब खालेद, फरीदखान फेरोज खान या आठ जणांना खून, अपहरण, पुरावा नष्ट करणे या कलामखाली प्रत्येकी जन्मठेप, प्रत्येकी 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन वर्षे सक्तमजूरी, मोक्का अंतर्गत 3, 1, 2,3(1) 2, आणि 3 व 4 या तिन्ही कलमान्वये प्रत्येकी जन्मठेप, प्रत्येकी 5 लाख रुपये दंड, दंड न भरल्यास तीन वर्ष सक्तमजूरी. या आठ आरोपींकडून 1 कोटी 20 लाख 88 हजार रुपये दंड वसूल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या गुन्ह्यात सबळ पुराव्या अभावी महमद शोएब, शेख हसन आणि महमद अश्‍पाक या तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 

असा लागला तपास
भाजीभाकरे यांच्या पथकाने कारवर उडालेली लाल माती शहराच्या परिसरात कुठे आहे याचा शोध घेतला असता ती पडेगावातील कासंबरी दर्गा परिसरातील असल्याचे लक्षात आल्यामुळे तपासाला गती देत आरोपीला ताब्यात घेतले.

चार वर्षांपासून होते जेलमध्ये

सुपारी किलर मेहंदीसह त्याच्या टोळीतील 8 जणांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. हे सर्व आरोपी मागील चार वर्षापासून औरंगाबादेतील हर्सूल कारागृहात होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खून खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर झाली असता मोक्काचे विशेष सरकारी वकील राजेंद्र मुगदिया यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. न्यायालयाने इम्रान मेहंदीसह आठ जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

न्यायालयाला छावणीचे स्वरूप

जानेवारी 2018 मध्ये मेहंदी सह त्याच्या टोळीला न्यायालयात हजर करण्यात आले असता माजी नगरसेवक सलीम कुरेशी समर्थक आणि इमरान मेहंदी गटात न्यायालयाच्या आवारातच मारहाण व दगडफेक झाली होती. या अनुषंगाने आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.

 

Web Title: criminal Imran Mehndi and his eight member Life imprisonment