esakal | शेतकऱ्यांसाठी पिकविमा कंपनीने निकष बाजूला ठेवून मदत करावी:आमित देशमुख ILatur
sakal

बोलून बातमी शोधा

अमित देशमुख

शेतकऱ्यांसाठी पिकविमा कंपनीने निकष बाजूला ठेवून मदत करावी: अमित देशमुख

sakal_logo
By
राम काळगे

निलंगा (जि. लातूर) : जिल्ह्यात मागील तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यासाठी विमा कपनीने निकष बाजूला ठेवून मदत करावी शिवाय शेतकऱ्यांना शासन कटीबध्द असल्याचे मत वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिक तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी गुरूवारी ता. 30 रोजी केले.

निलंगा तालुक्यातील गौर, मसलगा, ताजपूर, ढोबळेवाडी येथे मांजरा नदीच्या पुरामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पीकाच्या नुकसानीची पाहणी करवेळी ते बोलत होते. या प्रसंगी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, प्रदेश सचिव अभय साळुंके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जिल्हापरिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपविभागीय कृषि अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा कृषि अधिक्षक दत्तात्रय गावसाने, तहसीलदार गणेश जाधव, उपविभागीय पोलिस आधिकारी दिनेशकुमार कोल्हे, गटविकास आधिकारी अमोल ताकभाते, सुरेंद्र धुमाळ उपस्थित होते.

हेही वाचा: राष्ट्रीय पातळीवर मनसेशी युतीबाबत चंद्रकांत पाटील म्हणतात...

या वेळी पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन मांजरा व तेरणा नदीच्या अतिरिक्त पुरामुळे शेतकऱ्यांच्या खरिप पीकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. प्रशासनाने त्यांचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल शासनास सादर करावा असे निर्देश संबंधितांना दिले. शिवाय अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास शासन कटीबध्द आहे. असे स्पष्ट करून विमा कंपनीकडूनही निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या अडचणीत मदत करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पीक विम्याचे अर्ज स्विकरावेत

पीक विमा संदर्भातील ऑनलाईन व ऑफ लाईन पध्दतीने पीक विमा संदर्भात संबंधीतांनी गाव पातळीवर अर्ज स्वीकारावे अशा सुचना यावेळी त्यांनी प्रशासनास दिल्या. या पूर परिस्थीती पाहणी कार्यक्रमास पालकमंत्री देशमुख यांनी निलंगा तालुक्यातील गौर, मसलगा व ढोबळेवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतात जावून पीक नुकसानीची पाहणी करुन गावातील शेतकरी ग्रामस्थांशी अस्थेवाईकपणे चर्चा केली. त्यांच्या सूचना व मागण्याचे तात्काळ निराकरण करण्यात येईल असे स्पष्ट केले. यावेळी संबंधीत विभागाचे अधिकारी, कृषि सहायक, ग्रामसेवक, तलाठी,ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.

loading image
go to top