राजा उदार झाला, पण हाती भोपळा दिला ! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

बीड - पीक विम्यापोटी 265 कोटी रुपये मंजूर झाल्याचे ऐकून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेला आनंद क्षणभंगूर ठरला आहे. बॅंक खात्यावर रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा शेकडो शेतकऱ्यांना दहा रुपयांच्या आत पैसे मिळाल्याचे दिसले. विशेष म्हणजे नांदूरघाट (ता. केज) येथील 663 शेतकऱ्यांना प्रत्येकी केवळ एक रुपया पीकविमा मंजूर झाला आहे. त्यामुळे "पंतप्रधान पीकविमा योजना' म्हणजे "राजा उदार झाला अन्‌ हाती भोपळा दिला' अशीच ठरल्याची भावना व्यक्त होत आहे. 

पिकांचे नुकसान झाले तरी शेतकरी मोडून पडू नये म्हणून गतवर्षीपासून पंतप्रधान पीकविमा योजना सुरू झाली. दोन वर्षापूर्वी जिल्हा सलग चार वर्षे दुष्काळाला सामोरा गेला होता. त्यामुळे ऐंशी टक्‍क्‍यांपेक्षाही अधिक शेतकऱ्यांनी पीकविम्याचा मार्ग अवलंबिला होता. 

गतवर्षीच्या खरिपापोटी यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 265 कोटी रुपये पीकविमा मंजूर झाल्याचे प्रशासकीय पातळीवर सांगण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखेत विमा हप्ता भरलेल्या अनेक शेतकऱ्यांना मंजूर झालेली रक्कम पाहून धक्का बसला आहे. नांदूरघाट, अंमळनेर, धामणगाव, बालेपीर शाखांतील शेतकरी सभासदांच्या खात्यावर आलेली रक्कम अगदीच तुटपुंजी आहे. 

बळिराजाची थट्टा 
नांदूरघाट येथील तीळ पीक घेतलेल्या दीड हजार शेतकऱ्यांना 12 लाख 41 हजार रुपये मंजूर झाले आहेत. यातील 663 शेतकऱ्यांना केवळ एक रुपया पीकविमा आला आहे. याशिवाय 187 शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन, 25 शेतकऱ्यांना 3, 12 शेतकऱ्यांना 4, 26 शेतकऱ्यांना 5, एकाला 6, दोघांना 9 रुपये मंजूर झाले आहेत. आष्टी तालुक्‍यातील एकट्या धामणगावमधील एक हजार चारशेहून अधिक शेतकऱ्यांना दहा रुपयांच्या आत विमा मंजूर झाल्याचे उघडकीस आले आहे. बालेपीर शाखेतील पाचशेहून अधीक शेतकऱ्यांना शंभर रुपयांच्या आत तर एक हजार शेतकऱ्यांना शंभर ते दोनशे रुपयांच्या दरम्यान विमा मंजूर झाला आहे. 

Web Title: Crop insurance for farmer

टॅग्स