जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्यापोटी 154 कोटी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

बीड - मागील खरीप हंगामातील पीकविम्यापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 154 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. चार लाख 35 हजार 162 शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार असून ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग होईल. 

बीड - मागील खरीप हंगामातील पीकविम्यापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 154 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. चार लाख 35 हजार 162 शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार असून ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग होईल. 

मागील हंगामात पाऊस चांगला झाल्याने पिके जोमात होती; परंतु मध्येच अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनाम्याचे आदेश दिले होते. शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणावर पीकविमा भरला होता. शासनाने जिल्ह्यातील पीकविम्यासाठी एचडीएफसी अर्बो जनरल इन्शुरन्स कंपनी, तर फळपिकांसाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांची नियुक्ती केली आहे. या दोन्ही कंपन्यांद्वारे एकूण बारा पिकांसाठी चार लाख 34 हजार 162 शेतकऱ्यांना सुमारे 150 कोटी 16 लाख 67 हजार आणि फळपिकांसाठी तीन कोटी 67 लाख रुपये विमा मंजूर करण्यात आला आहे. 

तालुकानिहाय विमा 
- अंबाजोगाई ः 11 लाख 2424 हजार 
- परळी ः 44 कोटी 17 लाख 42 
- आष्टी ः एक कोटी 78 लाख 95 
- बीड ः 17 कोटी 28 लाख 79 हजार 
- धारूर ः 18 कोटी 65 लाख 41 हजार 
- गेवराई ः नऊ कोटी 61 लाख नऊ नऊ हजार 
- केज ः 13 कोटी 93 लाख 17 हजार 
- माजलगाव ः 11 कोटी 17 लाख 42 हजार 
- पाटोदा ः 31 कोटी 60 लाख 18 हजार 
- शिरूर ः एक कोटी 82 लाख 77 हजार 
 

Web Title: Crop Insurance to farmers