
हिंगोली : जिल्ह्यातील एक लाख ७२ हजार ८५ शेतकऱ्यांना १२४ कोटी ५३ लाखांचा खरीप पीकविमा मंजूर झाला असून ९७ कोटी १७ लाख रुपये एवढी रक्कम विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे. खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पीकविमा मंजूर झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
सततची नापिकी, निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. रब्बी किंवा खरीप हंगामात कोणते पीक घ्यावे, लागवडीचा खर्च तरी निघेल की नाही, याची चिंता शेतकऱ्याला सतत भेडसावत असते. निसर्गाच्या अस्मानी संकटांनंतर विमा कंपनीच्या सुलतानी संकटाने शेतकरी भरडून निघत होता.
हेही वाचा - लॉकडाउनचा फटका: टोमॅटो पिकात सोडली जनावरे
एक लाख ७२ हजार शेतकऱ्यांना पीकविमा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे तर फळ, भाजीपाला कवडीमोल दराने विकावा लागला. त्यामुळे शेतकरी हतबल झाले होते. मात्र, आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून जिल्ह्यातील तब्बल एक लाख ७२ हजार ८५ शेतकऱ्यांना १२४ कोटी ५३ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे.
९७ कोटी १७ लाख रुपये जमा
सोयाबीन, तूर, ज्वारी व इतर पिकांसाठी हा पीकविमा मंजूर झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, ९७ कोटी १७ लाख रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात विमा कंपनीने जमा केले आहेत. उर्वरित २७ कोटी रुपये येत्या दहा दिवसांत जमा करण्यात येणार आहेत.
खासदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना धरले होते धारेवर
खासदार हेमंत पाटील यांनी पीकविम्यााठी पाठपुरावा केला आहे. बहुतांश शेतकऱ्यांचे पीकविम्याचे अर्ज बाद केले असता विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले होते. त्यांनी जिल्हा नियोजन समिती ते संसदेपर्यंत सर्वच ठिकाणी शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा केला आहे. खरीपपूर्व हंगाम बैठकीतही त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरले आहेत.
येथे क्लिक करा - धक्कादायक : हिंगोलीत कोरोनाबाधितांचे अर्धशतक
१२७.४९ कोटींची मागणी
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह लोकप्रतिनिधी तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रत्यनामुळे जिल्ह्यात सोयाबीन, तूर, ज्वारी व इतर पिकांसाठी १२४ कोटी ५३ लाख रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात ९८ कोटी रक्कम जमा झाली असून उर्वरित रक्कम जमा होत आहे. जिल्ह्यात १२७.४९ कोटींची मागणी केली होती. त्यापैकी १२४.५३ कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला आहे.
- विजय लोखंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.