esakal | धक्कादायक : हिंगोलीत कोरोनाबाधितांचे अर्धशतक
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli photo

हिंगोलीत शुक्रवार (ता.एक) व शनिवार (ता.दोन) या दोन दिवसात ३२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून कोरोनाबाधितांची संख्या ५३ वर पोचली आहे. तसेच सध्या ४७१ रुग्णाचे स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढली आहे. 

धक्कादायक : हिंगोलीत कोरोनाबाधितांचे अर्धशतक

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५३ झाली असून यातील उच्च रक्तदाब, मधूमेहाचा आजार असलेल्या एसआरपीएफच्या चार जवानांना विशेष काळजी म्हणून औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आल्याचे जिल्‍हा शल्‍यचिकीत्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले. शुक्रवार (ता.एक) व शनिवार (ता.दोन) या दोन दिवसात ३२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनासह नागरिकही चिंतेत पडले आहे.


मुंबई व मालेगाव येथील बंदोबस्‍तावरून आलेल्या १९४ जवानांना कॉरंटाइन करण्यात आले आहे. त्यातील काही जवानांना कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. 

हेही वाचाकळमनुरीत दुकानाला आग, लाखोंची नुकसान

४७ जवानांना कोरोनाची लागण

यातील तब्बल ४७ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच इतर पाच जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील एसआरपीएफच्या चार जवानांना उच्च रक्तदाब, मधूमेहाची लक्षणे असल्याने त्यांना विशेष काळजी म्हणून औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

जवानांना एकत्रित ठेवल्याने आकडा वाढला

दरम्‍यान, हिंगोली येथील राज्य राखीव दलाच्या जवानांना तीन खोल्यात ठेवले होते. यामुळे कोरोनाबाधित व इतर जवान एकत्र आले. स्‍वच्‍छतागृहाचा देखील एकत्रीत वापर झाला. नास्‍ता व जेवण देखील एकत्रीत सुरू होते. त्यामुळे आपल्यापैकी कोण कोरोनाबाधित आहेत, याची खबर देखील जवानांना लागली नसल्याची चर्चा आहे. यामुळेच कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचा आरोप केला जात आहे.

एक रुग्ण कोरोनामुक्त

जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या सात क्वॉरंटाइन सेंटरमध्ये शनिवारपर्यंत (ता.एक) एक हजार २९१ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले होते. यातील ५३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील एक रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले. 

८७२ संशयित रुग्णांवर उपचार

सध्या ४७१ रुग्णाचे स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. यामध्ये हिंगोली येथील आयसोलेशन वार्डात सात, वसमत येथील शासकीय क्वॉरंटाइन सेंटरमध्ये ४१, कळमनुरी २१७, औंढा नागनाथ ६१, सेनगाव दोन, हिंगोलीतील क्वॉरंटाइन सेंटरमधील १४३ जणांचा समावेश आहे. दरम्यान, यातील ७६७ संशयित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने यातील ४११ जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या सात सेंटरमध्ये ८७२ संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

येथे क्लिक करा - निष्काळजीपणा : जवानाच्या एकत्रितपणामुळे हिंगोलीत पॉझीटीव्ह वाढतायेत

४७ जवानांचा समावेश

कोरोनाबाधित ५३ रुग्णांमध्ये ४७ एसआरपीएफ जवानांचा समावेश आहे. यातील एक जवान जालना येथील एका एसआरपीएफ जवानाचा तर उर्वरित हिंगोलीतील एसआरपीएफ जवानांचा समावेश आहे. शुक्रवार व शनिवार असे दोन दिवसांत तब्बल ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनही चिंतेत पडले आहे.