पीकविम्याने ‘यांना’ मिळाला आधार

NND02KJP01.jpg
NND02KJP01.jpg
Updated on

नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील खरीप हंगामातील सोयाबीन, ज्वारी व उडीद या पिकांसाठी ३१३ कोटींचा विमा मंंजूर झाला आहे. हा पीकविमा शेतकऱ्यांचा खात्यावर जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. दोन) जिल्हाधिकारी डॉ. विपीन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांचे आभार मानले.

सहा लाख तीस हजार शेतकऱ्यांना परतावा
खरीप हंगाम २०१९ - २०२० मध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सोयाबीन, ज्वारी व उडीद या पिकांसाठी पीकविमा भरलेल्या सहा लाख तीस हजार शेतकऱ्यांना ३१३ कोटी ६९ लाख रुपयांचा विमा परतावा मंजूर झाला. सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, उडीद व मूग या सहा पिकांसाठी १२ लाख पाच हजार अर्जदार शेतकऱ्यांनी पन्नास कोटींचा विमा हप्ता भरला होता. पाच लाख ८७ हजार हेक्टरसाठी भरलेला हा विमा दोन हजार २४२ कोटी संरक्षित रकमेसाठी होता. 

कमी-अधिक पर्जन्यमानाचा फटका
यंदाचे कमी - अधिक पर्जन्यमान तसेच अतिवृष्टीत पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या काळात खरीप पिकांची अंतिम आणेवारी पन्नास पैशाच्या आत जाहीर झाली होती. या सोबतच जिल्ह्यात ‘क्यार’ व ‘महा’चक्री वादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील कोरडवाहू, बागायती व बहुवार्षिक अशा एकूण सहा लाख ४८ हजार ३१६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. यात सात लाख १८ हजार ४३६ शेतकरी बाधित झाले होते. यात शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाकडून ५०७ कोटींची मागणी केली होती. ही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. 

विमा भरलेल्या शेतकऱ्यांचे झाले नुकसान
पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे महसूल, कृषी व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त पंचनामे करून विमा कंपनीकडे सादर करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून केलेल्या कामामुळे शेतकऱ्यांना विमा मजूर झाल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

प्रशासनाचे मानले आभार
तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्यासह नूतन जिल्हाधिकारी डॉ. विपीन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी रविप्रसाद सुखदेव यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. यावेळी उपस्थित असलेल्या तळणी (ता. नांदेड) येथील जीवनाजी सूर्यवंशी यांना ज्वारीसाठी पाच हजार सातशे विमा मिळाला. तर संतोष कामाजी सूर्यवंशी यांच्या खात्यार चार हजार तिनशे रुपये विमा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com