Accident : उदगीर बिदर रस्त्यावर क्रुझर-कारचा अपघात; बारा जण जखमी

उदगीर शहरालगत असलेल्या नांदेड-बिदर रोडवर शुक्रवारी (ता. ५) रोजी क्रुझर व कारचा अपघात झाला.
cruiser car accident
cruiser car accidentsakal

उदगीर, (जि. लातुर) - शहरालगत असलेल्या नांदेड-बिदर रोडवरील शेल्हाळ पाटील जवळ शुक्रवारी (ता. ५) रोजी दुपारी एकच्या सुमारास क्रुझर व कारचा अपघात झाला आहे. या अपघातात परभणी येथील तेरा जण जखमी झाले आहेत. पैकी एका गंभीर जखमीस लातूरला हलवण्यात आली आहे.

याबाबत शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास परभणी येथील देवदर्शनासाठी निघालेले क्रुझर जीप क्रमांक एम एच १३ एसी ५२१७ मी परभणी येथून बासर येथे दर्शन घेऊन उदगीर मार्गे तुळजापूर कडे जात होती.

जवळील शेल्हाळ पाटी जवळ या क्रुझर जीपची व होंडा कंपनीच्या कार क्रमांक एम एच १३ बीएल १२२५ या कारची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला या अपघातात क्रुझर चा चालक दीपक मोरे याचा हात तुटून गंभीर जखमी झाल्याने लातूरच्या जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आली आहे.

उर्वरित जखमींची नावे पुढीलप्रमाणे महादेव पिटलेवाड, सुनीता पिटलेवाड, तारामती कवरे, रेणुका मेतळे, अमोल भुसारे, जयश्री भुसारे, अश्विनी अर्जुने, करण कवरे, मुक्ता पिटलेवाड, गायत्री पिठलेवाड, संदीप पिटलेवाड, गजानन मेताळे अशा बारा जणांना येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील जखमी हे आडगाव (ता. सेलु) कीर्तीपूर, कुंभारी, गुलकंडे या गावातील असल्याचे कळते.

पोलीस व आरोग्य विभागाची अनास्था

या अपघातानंतर संबंधित गाडीतील प्रवाशांनी ११२ वर कॉल करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर या जखमींना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले दोनच्या सुमारास दाखल करण्यात आल्यानंतर आरोग्य विभागाकडून पाच वाजता एम एल सी शहर पोलीस ठाण्याला पाठवण्यात आली त्यानंतर संबंधित अंमलदाराने साडेसात वाजता ही एम एल सी ताब्यात घेऊन ग्रामीण पोलीस स्टेशनला सुपूर्द केली.

ग्रामीण पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी याप्रकरणी एम एल ची आल्यानंतर जवाब घेऊन गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगितले. मात्र ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या अपघाताकडे ग्रामीण पोलीसानी दुर्लक्ष केल्याचे दिसुन आले.

या अपघात प्रकरणी जबाबदारी देण्यात आलेले पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही कदाचित त्यांना सुद्धा हा अपघात झालेला आहे हे माहिती नसावी अशी चर्चा सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com