‘नोटा’रेटी कायमच!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

नोटाबंदीमुळे रात्री उशिरापर्यंत एटीएममध्ये गर्दी, बाजारपेठेत मंदी

बीड - चलनातील ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाला दीड महिना पूर्ण झाला; मात्र नवीन चलनाचा तुटवडा कायम असल्याने बॅंका आणि एटीएम मशीनसमोर गर्दी आहे. तास-दोन तास रांगेत थांबवूनही पैसे संपल्याने अनेकांना खालीहात परतावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होत आहे. 

नोटाबंदीमुळे रात्री उशिरापर्यंत एटीएममध्ये गर्दी, बाजारपेठेत मंदी

बीड - चलनातील ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाला दीड महिना पूर्ण झाला; मात्र नवीन चलनाचा तुटवडा कायम असल्याने बॅंका आणि एटीएम मशीनसमोर गर्दी आहे. तास-दोन तास रांगेत थांबवूनही पैसे संपल्याने अनेकांना खालीहात परतावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होत आहे. 

नोटाबंदीच्या निर्णयाला ४६ दिवस झालेत; मात्र चलन तुटवड्यामुळे हक्‍काचे पैसे काढणेही मुश्‍कील झाले आहे. पैशांची गरज असतानाही ग्रामीण भागातील बॅंकांमध्ये केवळ दोन हजार रुपये मिळत आहेत; तर शहरातील बॅंका जसा पुरवठा आहे त्यानुसार रक्कम हाती टेकवत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मिळतील तेवढे पैसे स्वीकारण्याशिवाय पर्याय उरला नाही.

दरम्यान, पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी असल्याने लवकर नंबर लागावा म्हणून अनेक जण सकाळी सात वाजतापासूनच बॅंकांसमोर आणि एटीएमबाहेर गर्दी करीत आहेत. या दोन्ही ठिकाणांहून दोन हजार रुपये मिळविण्यासाठी दोन तास सहज खर्ची करावे लागत आहेत. सर्व कामे सोडून नागरिकांना बॅंका, एटीएममधून पैसे काढण्यासाठी वेगळा वेळ काढावा लागत आहे. त्यामुळे या निर्णयाचे सुरवातीला स्वागत करणारे आता संताप व्यक्‍त करीत आहेत. बॅंकांतून प्रत्येक दिवशी १० हजार रुपयांपर्यंतची रक्‍कम काढली जाऊ शकते, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात चलन तुटवड्यामुळे केवळ दोन हजार रुपयेच दिले जात आहेत. 

दरम्यान, दिवसभर काम असल्याने अनेक जण बॅंकेमध्ये रांगेत उभे राहू शकत नाहीत. त्यामुळे एटीएम बाहेर रात्री आणि सकाळीसुद्धा रांगा लागत आहेत. काही बॅंकांच्या एटीएममध्ये रात्री ११ च्या सुमारास पैसे भरले जात आहेत. त्यामुळे काहीजण रात्री उशिरा जाऊन पैसे काढतात; तर काही नागरिक मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी एटीएममध्ये जाऊन पैसे काढत आहेत. त्यामुळे दुपारीच एटीएम रिकामे होत आहे.  

सुट्या पैशांची चणचण
जिल्ह्यातील एटीएम व बॅंकामधून दोन हजार रुपयांच्या नोटा मिळत आहेत. त्या तुलनेत ५०० रुपयांच्या नवीन नोटा खूप कमी प्रमाणात चलनात आल्या आहेत. त्यामुळे सुट्या पैशांची चणचण भासत आहे. जिल्ह्यात नोटाबंदीच्या निर्णयास जवळपास दीड महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर नव्या पाचशे रुपयांच्या नोटाचे दर्शन झाले; मात्र अद्यापही जिल्ह्यातील काही बॅंकांतूनच पाचशेच्या नोटा मिळत नाहीत.

Web Title: currency ban in beed