बॅंका ऑक्‍सिजनवरच; एटीएमची दारे बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

अठरा दिवस उलटले, तरी रिझर्व्ह बॅंकेकडून कॅश येईना
औरंगाबाद - पगारदार, पेन्शनधारकांच्या बॅंकांसमोर रांगा लागलेल्या असताना बॅंकांकडे कॅशअभावी आर्थिक आणीबाणीची परिस्थिती उद्‌भवली आहे. अठरा दिवस उटले तरी शहरात रिझर्व्ह बॅंकेकडून कॅश उपलब्ध करण्यात आली नसल्याने आता ग्राहकांना देण्यासाठी बॅंकांकडेच पैसेच नाहीत; तर एटीएमची दारेसुद्धा कॅशअभावी बंद होण्यास सुरवात झाली आहे.

अठरा दिवस उलटले, तरी रिझर्व्ह बॅंकेकडून कॅश येईना
औरंगाबाद - पगारदार, पेन्शनधारकांच्या बॅंकांसमोर रांगा लागलेल्या असताना बॅंकांकडे कॅशअभावी आर्थिक आणीबाणीची परिस्थिती उद्‌भवली आहे. अठरा दिवस उटले तरी शहरात रिझर्व्ह बॅंकेकडून कॅश उपलब्ध करण्यात आली नसल्याने आता ग्राहकांना देण्यासाठी बॅंकांकडेच पैसेच नाहीत; तर एटीएमची दारेसुद्धा कॅशअभावी बंद होण्यास सुरवात झाली आहे.

नोटाबंदीनंतर बॅंकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी झुंबड उडाली होती. बहुतांश नागरिकांनी त्यांच्याकडील जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटा जमा केल्या आहेत. बॅंकांमध्ये जुन्या नोटा जमा करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतपत आहे. सध्या शासकीय कर्मचारी वर्ग, पेन्शनदारांची रक्कम खात्यात जमा झालेली असताना त्यांना बॅंकेतून फक्त दोन ते पाच हजारांची रक्कम हातात पडत आहे. काही मोजक्‍याच एटीएमध्ये गेले तरी तेथे फक्त दोन हजार नोट रुपयांची उपलब्ध आहे. अडीच हजार रुपये काढण्याची मुभा असली तरी दोन हजारांची नोट असल्याने एटीएमधून हातात फक्त दोन हजार रुपयेच पडत आहेत. त्यामुळे ज्यांना रोकडीची आवश्‍यकता आहे अशांचे टेन्शन दिवसेंदिवस वाढत आहे.

काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बॅंकेने औरंगाबादेत 112 आणि 197 कोटी रुपयांचे नोटांचे कंटनेर पाठविले होते. यामध्ये बहुतांश नोटा या दोन हजार रुपयांच्या होत्या. सध्या पगारदार वर्गासाठी तातडीने शहरात 700 कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. बॅंकांनी साडेतीन हजार कोटी रुपयांची मागणी केली असली तरी अठरा दिवसांपासून बॅंकांकडून एक रुपयासुद्धा मिळालेला नाही. ग्रामीण भागातून बॅंकांना रोकडीची जमवाजमव करावी लागताना दिसते. ग्रामीण भागातही बॅंकांसमोरील गर्दी वाढत चालल्याने सध्या गंभीर आर्थिक संकटाची परिस्थिती दिसते.

पाचशे रुपयांची नोट केव्हा येणार?
बॅंकांकडील शंभर रुपयांच्या नोटा जवळपास संपल्या आहेत. दोन हजारांची नोट बॅंकेकडून ग्राहकांच्या हातात दिली जात असली तरी व्यवहार करण्यासाठी दोन हजार रुपये अडचणीचे ठरत आहेत. ज्यांनी शंभर रुपयांच्या नोटा घेतल्या आहेत, ते काटकसरीने खर्च करत असल्याने व्यवहारात शंभर रुपयांच्या नोटांची टंचाई निर्माण झाली. मुंबई, पुण्यासह इतर शहरांत पाचशे रुपयांच्या नोटा आलेल्या असल्या तरी औरंगाबाद शहरात अद्यापही पाचशे रुपयांच्या नोटा आल्या नाहीत. या सर्वांमुळे सुट्या पैशांची समस्या चलनात आहेच.

Web Title: currency bank effect