पाचशे, शंभरच्या नोटांना मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - बॅंकांमधून दोन हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध होत असल्या तरी सुट्टे पैसे मिळण्यास अडचणी येत असल्याने नागरिकांतर्फे पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटांची मागणी जिल्ह्यात अधिक आहे. जिल्हाधिकारी निधी पांडेय यांनी आतापर्यंत घेतलेल्या आढाव्यातून ही बाब समोर आली. बॅंकांनी याची माहिती आरबीआयला कळवल्याचेही त्यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 654 कोटी रुपये जुन्या चलनाच्या नोटा जमा झाल्या आहेत. तर दुसरीकडे आरबीआयकडून आतापर्यंत सोळाशे कोटी रुपये प्राप्त झालेत. त्यापैकी बाराशे कोटी रुपये वितरित करण्यात आले असून उर्वरित 416 कोटी रुपये बॅंकांकडे उपलब्ध आहेत. हा पैसा नजीकच्या काळात वितरित होणार आहे. बॅंकांसमोरची गर्दी कमी झाली असून एटीएमसमोरही मोठ्या रांगांचे चित्र नसल्याचे त्या म्हणाल्या. जिल्ह्यात पाचशे, शंभर रुपयांच्या नोटांची मागणी बॅंकांमार्फत वरिष्ठ कार्यालयांकडे कळविण्यात आली असून लवकरच या नोटा उपलब्ध होतील. जिल्ह्यात सहाशेंवर एटीएम असून त्यातील चारशे एटीएम शहरात आहेत. यातील बहुतांश एटीएमची नवीन नोटांच्या दृष्टीने जुळवणी करण्यात आली आहे, अशी माहिती श्रीमती पांडेय यांनी दिली.

शेतीमालाला फटका
मालवाहतूक, कृषी उत्पन्न बाजार, प्रवासी वाहतूक, शेतीमाल याला पाच ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत फटका बसला आहे. नोटाबंदीसह त्याला इतरही कारणे आहेत. नागरिकांतर्फे खर्चापुरते चलन बाहेर काढले जात आहे. जुन्या नोटांबाबतीत आरबीआयने काही नियम केले असून काही बाबतीत सूट दिली आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरिकांना काही अडचणी येत असल्यास त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

Web Title: currency market