Dharashiv News : परंड्यात ऐतिहासिक वटवृक्षाची कत्तल; प्रशासकीय इमारतीसाठी तोड, पर्यावरणप्रेमींत संताप

शहरातील जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारातील ऐतिहासिक वारसा असलेल्या वटवृक्षाच्या झाडाची मागील दोन दिवसापासून मशिनद्वारे कत्तल
cutting historical banyan tree for administrative building paranda dharashiv anger of environmentalist
cutting historical banyan tree for administrative building paranda dharashiv anger of environmentalist sakal

परंडा : शहरातील जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारातील ऐतिहासिक वारसा असलेल्या वटवृक्षाच्या झाडाची मागील दोन दिवसापासून मशिनद्वारे कत्तल करण्यात येत आहे. या ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम होणार असल्याचे सांगण्यात येते. याबाबत शहर व परिसरातील वृक्षप्रेमी व नागरीकात हळहळ व संताप व्यक्त होत आहे.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार ५० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या वृक्षास वारसावृक्ष (हेरिटेज ट्री) म्हणून मान्यता दिली जाते. असे झाड तोडण्यास राज्याच्या वनविभागाची परवानगी लागते. परंडा हा दुष्काळगृस्त तालुका असून इथे मोठ्या वृक्षाचे जतन व संरक्षण करणे राज्य शासनाची जबाबदारी आहे.

मात्र असे असतानाही शहरातील जुन्या तहसील कार्यालय आवारातील ऐतिहासिक विशाल वडाच्या झाडाची बेदरकारपणे कत्तल करण्यात आली आहे. याठिकाणी नवीन प्रशासकीय इमारतीचे काम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

परंतु या जुन्या तहसील कार्यालयाचा परिसर चौहोबाजूंनी विस्तीर्ण आहे. हे वडाचे झाड वाचवून इमारत बांधकामाचे नियोजन करता आले असते. किंवा त्याच्या केवळ फांद्या तोडून ते झाड वाचवता आले असते. सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्तव्यदक्ष अभियंत्यांनी पर्यावरणप्रेमींची ही सूचना डावलून ही कत्तल केल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी करत आहेत.

हा वटवृक्ष निजामकालीन असून परंड्याच्या भुईकोट किल्ल्याची अनेक वर्षांपासून साथसंगत करत आला असल्याचे जाणकार सांगतात. हा वटवृक्ष स्वातंत्र्यलढ्याच्या आधीपासून अनेक घटनांचा साक्षीदार वृक्ष होता.

शासन शतकोटी वृक्ष लागवड करण्यासाठी एकीकडे सक्ती करते तर दुसरीकडे अशी वारसावृक्ष तोडत आहे. हे धोरण अत्यंत विसंगत असल्याचे मत वृक्षप्रेमीं नागरिक व्यक्त करत आहेत.

लोकभावना लक्षात घेऊन या वटवृक्षाचे जतन सरंक्षण होणे गरजेचे होते. हे झाड संरक्षित करुन नूतन प्रशासकीय इमारत उभी कशी करता येईल, याबाबत संबधिताना सूचित केले होते. हा विषय सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येतो.

-घनश्याम अडसूळ, तहसीलदार, परंडा

या जुन्या तहसील आवारात नूतन प्रशासकीय इमारतीला मंजुरी मिळाली आहे. याठिकाणी इमारतीस जागेस अडचणीचे होत असल्याने पालिका प्रशासन व वनविभागाची परवानगी घेऊन वटवृक्षाची जाहीर निविदा २८ आॕगस्ट रोजी काढली होती. त्यानुसार संबधिताकडून लिलावाची रक्कम घेऊन झाडे तोडण्यात येत आहेत.

- श्री. मळगीकर, उपविभागीय अभियंता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com