सावधान... सायबर गुन्हे वाढताहेत ! पोलिसांचे सोशल मीडियावरून आवाहन

Cyber Crime News Latur
Cyber Crime News Latur

लातूर : मोठ्या शहरांत सायबर गुन्हे दररोज घडतात. याच दिशेने लातूरसारख्या शहरांची वाटचाल हळूहळू सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यात तब्बल चार सायबर गुन्हे शहरात घडल्याचे समोर आले आहे. यात शेतकऱ्यांपासून उच् शिक्षित नागरिकांची फसवणूक झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वाढते सायबर गुन्हे लातूरकरांसाठी चिंतेचा आणि झोप उडविणारा विषय ठरत चालला आहे. या पार्श्वभूमीवर, लातूर पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लातुरातील नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.


देशात सर्वाधिक सायबर गुन्हे महाराष्ट्रात घडत असल्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. महानगरांत सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता वाढत असली तरी तेथे गुन्हे दररोज घडताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे, सायबर गुन्हेगार लहान शहरांतील आणि ग्रामीण भागातील लोकांपर्यंतही पोचत आहेत. त्यामुळे लातूर शहरांतही गेल्या तीन वर्षांत सायबर गुन्ह्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. लातूरात घडणाऱ्या या घटनांपैकी ७० टक्के घटना आर्थिक फसवणुकीच्या आहेत. २५ टक्के घटना जात-धर्म, महापुरुषांची बदनामी, तर उर्वरित पाच टक्के घटना सोशल मीडियावर मुलींची छायाचित्र क्लिप टाकून बदनामी करणाऱ्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाने वेळीच खबरदारी घेतली नाही तर सायबर गुन्ह्यांचे हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.


मी सैनिक आहे. माझी बदली झाली आहे, असू सांगून कमी किमतीत वाहन विक्री करायची आहे, अशा फसवणुकीच्या जाहिराती वेगवेगळ्या ॲपवर येत आहेत. बँकेचा अधिकारी आहे, असे सांगून खातेदारांकडून दूरध्वनीवरून वैयक्तिक माहिती घेतली जात आहे. लकी ड्रॉमध्ये तुम्हाला बक्षीस म्हणून कार मिळाली आहे. पैसे भरून घेऊन जा, असेही दूरध्वनी केले जातात. भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) बोनस तुम्हाला मंजूर झाले आहे, अशी बतावणी करून ठेवा म्हणून काही रक्कम भरण्यास सांगितली जाते. अशा प्रकारच्या कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता अनोळखी व्यक्तीस आपली कोणतीही खासगी माहिती, मोबाईल क्रमांक, जन् तारीख, ई-मेल आयडी, आधारकार्ड, पॅनकार्ड क्रमांक, बँकेसंबंधीची माहिती देऊ नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अपर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, सायबर सेलचे पोलिस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांनी सोशल मीडियावरून केले आहे.


गुन्ह्यांची आकडेवारी
२०१५ : १५
२०१६ : १३
२०१७ : २३
२०१८ : २२
२०१९ : २७


पोलिसांचा सल्ला
- फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामचे पासवर्ड म्हणून मोबाईल क्रमांक किंवा जन्मतारीख ठेवू नका
- मोबाईलला पिन किंवा पॅटर्न लॉक ठेवा. गहाळ झाल्यास दुरुपयोग होणार नाही
- मोबाईलमधील एसएमएस, ई-मेलला दुसरा पासवर्ड ठेवा. ओटीपी सुरक्षित राहील.
- एसएमएस, ई-मेलद्वारे येणाऱ्या अज्ञात ब्लूयू लिंकला क्लिक करू नका. कारण मोबाईलमधील डाटा चोरीला जातो.
- तुम्ही भरघोस बक्षीस जिंकलात, असे कॉल आल्यास त्यांना प्रतिसाद देऊ नका. वैयक्तिक माहितीही देऊ नका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com