स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सायकल मोर्चा

कैलास चव्हाण
सोमवार, 28 मे 2018

परभणी : रासायनीक खते आणि इंधनाची दरवाढ कमी करण्याची मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (ता.28) सायकल मोर्चा काढला. 

परभणी : रासायनीक खते आणि इंधनाची दरवाढ कमी करण्याची मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (ता.28) सायकल मोर्चा काढला. 

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरुन सकाळी 11 वाजता मोर्चा निघाला. शहरातील वसमत रस्त्याने निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात विसावला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्विकारले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृवात काढलेल्या मोर्चाद्वारे इंधन आणि खताची दरवाढ कमी करावी, जिल्ह्यातील 13 हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी अशा मागण्या करण्यात आल्या. 

Web Title: cycle rally of swabhimani shetkari sanghatana