
मुंबई : कर्नाटक किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात बुधवारी (ता. २१) चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावाखाली २२ मेच्या आसपास याच प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते उत्तरेकडे सरकून आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. परिणामी २१ ते २५ मेदरम्यान मुंबई आणि दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान अंदाज केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिला आहे.