जालन्यात तीन तलवारींसह खंजीर जप्त

जालन्यात दोन संशयित पकडले, सदर बाजार पोलिसांची कारवाई
जप्त केलेल्या तलवारी व खंजीर.
जप्त केलेल्या तलवारी व खंजीर.Sakal

जालना - शहरातील संग्रामनगर येथील एका वाड्यात सदर बाजार पोलिसांनी गुरूवारी (ता.१४) छापा टाकून तीन तलवारी व एक खंजीर जप्त केले आहे. शिवाय या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. जालना बसस्थानक परिसरात असलेल्या संग्रामनगर भागात एका वाड्यात घातक शस्त्रे असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली. त्यानुसार सदर बाजार पोलिसांनी या ठिकाणी गुरूवारी (ता.१४) दुपारी छापा टाकला. यात पोलिसांनी दोन इसमांना ताब्यात घेऊन झडती घेतली, त्यात त्यांच्याजवळ तीन तलवारी आणि एक खंजीर मिळून आला आहे. या प्रकरणी संशयित उमेश अर्जुन शेळके (वय २४) आणि संदीप दीपक चांदणे (वय २० दोघे रा.भीमनगर, जालना) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, पोलिस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, पोलिस अंमलदार कैलास खार्डे, भरत ढाकणे, सोपान क्षीरसागर यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com