esakal | तुळजापूरला रोज चार हजार भाविकांना दर्शनाची संधी, एक हजार जणांसाठी सशुल्क व्यवस्था
sakal

बोलून बातमी शोधा

Tuljabhavani Mata Mandir

तुळजाभवानी मातेचे मंदिर सोमवारपासून (ता. १६) भाविकांसाठी खुले झाले असून एक हजार भाविकांना प्रत्येकी तीनशे रुपये भरून सशुल्क तर तीन हजार भाविकांना पारंपरिक रांगेतून दर्शन घेऊ दिले जात आहे.

तुळजापूरला रोज चार हजार भाविकांना दर्शनाची संधी, एक हजार जणांसाठी सशुल्क व्यवस्था

sakal_logo
By
जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेचे मंदिर सोमवारपासून (ता. १६) भाविकांसाठी खुले झाले असून एक हजार भाविकांना प्रत्येकी तीनशे रुपये भरून सशुल्क तर तीन हजार भाविकांना पारंपरिक रांगेतून दर्शन घेऊ दिले जात आहे.येथे दरवर्षी नवरात्रोत्सवात तीनशे रुपये देऊन सशुल्क दर्शन घेण्याची सुविधा आहे. कोरोनामुळे सुमारे आठ महिने बंद असलेले मंदिर काही नियम व अटी पाळून भाविकांसाठी खुले झाल्यानंतर सशुल्क दर्शनाची पद्धत सुरू ठेवण्यात आली आहे.

‘कोन बनेगा करोडपती’मधून बोलत असल्याचे सांगत साडेतीन लाखांची फसवणूक, उस्मानाबाद जिल्ह्यातील घटना

पहिल्या दिवशी सशुल्क दर्शनाचे पास मिळविण्यासाठी काहीकाळ गर्दी झाली. दोन धर्मशाळांत पासची सोय केल्याचे मंदिर प्रशासनाने जाहीर केले होते. भाविक मात्र मंदिर समितीच्या कार्यालयात दिवसभर पासची चौकशी करताना दिसत होते. सुरक्षा कर्मचारी भाविकांना सामोरे जात होते. पासच्या ठिकाणी गर्दी करू नये, असे निर्देश पोलिसांनी दिले होते. काल (ता. १७) दुपारी भाविकांची संख्या वाढल्याने पास देणे थांबविण्याची वेळ मंदिर प्रशासनावर आली. आज भाविकांची संख्या तुलनेत कमी होती. दरम्यान, गर्दीच्या कालावधीत सशुल्क पासचे दर तीनशे आणि पाचशे रुपये करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने काही फेरबदल करून भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था केली आहे. मंदिरात काही धोरणात्मक निर्णय घ्यावयाचे झाल्यास विश्वस्त सभेचा ठराव करावा लागतो. पूर्वी सशुल्क दर्शन पास शंभर रुपये होता. सध्या तो तीनशे रुपये आहे. गर्दी कमी झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे दर आकारला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

थर्मल स्क्रीनिंग, मास्क
तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांचे थर्मल स्क्रीनिंग आणि त्यांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. दरम्यान, मंदिरात पुजाऱ्यांसाठी असलेला पारंपरिक मार्ग सध्या बंद ठेवण्यात आला असून दर्शन मंडपातून पुजाऱ्यंना प्रवेश दिला जात आहे.
 

Edited - Ganesh Pitekar

loading image