दानवे, कुलकर्णी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

काॅंग्रेस शिवसेना
काॅंग्रेस शिवसेना

औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी गुरुवारी (ता.एक) महायुतीकडून अंबादास दानवे, तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून बाबूराव कुलकर्णी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी दाखल करण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस होता. 

शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे हे दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खास मुंबईहून औरंगाबादेत आले होते. क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर श्री. शिंदे, चंद्रकांत खैरे, डॉ. भागवत कराड आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन श्री. दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. 


श्री. कुलकर्णी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार सतीश चव्हाण, आमदार सुभाष झांबड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, नामदेव पवार, जालना येथील जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, औरंगाबाद प्रभारी भीमराव डोंगरे, प्रभाकर पालोदकर, किरण पाटील डोणगावकर, जगन्नाथ काळे, कन्नडचे नगराध्यक्ष संतोष कोल्हे, खुलताबादचे नगराध्यक्ष ऍड. खमड, महापालिकेचे गटनेते भाऊसाहेब जगताप, जालना येथील सभापती तौर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

या निवडणुकीच्या मैदानात श्री. दानवे, श्री. कुलकर्णी यांच्यासोबतच कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडलेले आमदार अब्दुल सत्तार यांचे समर्थक नंदकिशोर सहारे व शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे विशाल नांदरकर यांचा समावेश आहे. पाच ऑगस्टला दाखल अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर नेमकी लढत कोणामध्ये होईल, हे चित्र स्पष्ट होईल. 19 ऑगस्टला सकाळी आठ ते दुपारी चारदरम्यान मतदान होईल. 22 ऑगस्ट रोजी मतमोजणी होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com