जमिनीतून तीन वेळा आला गूढ आवाज...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

हिंगोली : वसमत तालुक्‍यातील पांगरा शिंदे येथे रविवारी (ता. 20) 10.13, 10.42 व 2.05 असे एकापाठोपाठ एक तीन वेळेस जमीनीतुन गूढ आवाज आल्याने ग्रामस्‍थांची झोप उडाली असून हे आवाज कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्‍यातील काही गावात आले आहेत. यामुळे कोणतीही हाणी मात्र झाली नसल्याचे ग्रामस्‍थ सांगत आहेत. 

वसमत तालुक्‍यातील पांगरा शिंदे येथे मागच्या काही दिवसापासून  जमिनीतुन गूढ आवाज येण्याची मालीका सुरू आहे. आता पर्यंत गावात 80 वेळेस हे आवाज आले आहेत. या आवाजाने ग्रामस्‍थातुन भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागच्या आठवड्यात जिल्‍हा आपत्ती व्यवस्‍थापनाने येथे पथनाट्यातुन भुंकपाबाबत जनजागृती केली आहे. मात्र या आवाजाचे गुढ काही अद्याप उकलले नाही. 

दरम्‍यान, रविवारी रात्री 10.13, 10.42 व 2.05 असे तीन वेळेस आवाज झाले हे आवाज वसमत तालुक्‍यातील पांगरा शिंदे गावासह वापटी, कुपटी, सिरळी, खापरखेडा आदी गावात झाले आहेत. तर औंढा नागनाथ तालुक्‍यातील आमदरी तर कळमनुरी तालुक्‍यातील बोल्‍डा, असोला, म्‍हैसगव्हाण, हारवाडी या गावात जाणवल्याचे ग्रामस्‍थ सांगत आहेत. या आवाजाने मात्र ग्रामस्‍थातुन भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी रात्र जागुन काढली आहे. आवाजा बाबत सरपंच भागवत शिंदे यांनी जिल्‍हा 
प्रशासनाकडे माहिती दिली आहे. 

Web Title: dangerous noise from land in hingoli