सराफा बाजारात झळाळी टिकून

Jewellery-Purchasing
Jewellery-Purchasing

औरंगाबाद - दसऱ्याला सोने खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने लहान-मोठ्या गुंतवणूकदारांसह मध्यमवर्गीयांनी गुरुवारी (ता.१८) मोठ्या प्रमाणात सराफा बाजारात गर्दी केली होती. शेअर बाजारातील अनिश्‍चितता, मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर सोन्या-चांदीच्या बाजारात मात्र बऱ्यापैकी स्थैर्य टिकून असल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले.

सध्या सोन्याच्या बाजारात उत्साह असून, दर २२ कॅरेटसाठी ३१ हजारांपर्यंत तर २४ कॅरेटसाठी ३२ हजार, तसेच चांदी ४० हजारांच्या आसपास स्थिर आहे. महिनाभरात तीन वेळा शेअर बाजार कोसळल्याने शेअर बाजाराबाबत सध्या अनिश्‍चितता आहे. त्यामुळे लहान गुंतवणुकीसाठी पारंपरिक सोन्या-चांदीतील गुतंवणूक हाच आधार वाटतो. त्याचाच प्रत्यय सराफा बाजारात दिसून येत आहे. 

पारंपरिक दागिन्यांना पसंती 
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर महिलांच्या दागिन्यांत मंगळसूत्र, नेकलेस, बांगड्या, साखळी यामध्ये नावीन्यपूर्ण नक्षीदार प्रकार उपलब्ध आहेत. आकर्षक नक्षीकाम असलेल्या बांगड्यांची क्रेझ आहे. गळ्यातील साध्या साखळीऐवजी यांत्रिक पद्धतीने बारीक सोन्याच्या साखळीचे युवती, महिलांमध्ये आकर्षण आहे. शिवाय चांदीच्या पारंपरिक भांड्यात गुंतवणूक करणारा वर्गही आहे. 

खरेदीसाठी बाजारात झुंबड 
सराफा व्यावसायिकांनी विविध आकर्षक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये सोन्याच्या वजनाइतकी चांदी, हप्त्याने दागिने खरेदी, मजुरीवर सवलत तसेच ऑनलाइन दागिने खरेदीपर्यंतच्या विविध योजना आहेत. लहान व कमी वजनाच्या आकर्षक दागिन्यांना मागणी आहे. साधे वेढे, शुद्ध सोन्याचे वेढ्यांचे आकर्षण आहे. तसेच शुद्ध सोन्याचे वेढे बनविणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

महिलांमध्ये पारंपरिक दागिन्यांना जास्त पसंती आहे. तसेच यंदा डायमंडचेही वेगवेगळे प्रकार ग्राहकांसाठी उपलब्ध असल्याने त्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. 
- सुनील अंबेडे, उपसरव्यवस्थापक, पीएनजी ज्वेलर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com