Jalna News : दासू वैद्य यांना ‘दुःखी’ पुरस्कार जाहीर, इंद्रजित घुले यांना ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार; ९ एप्रिलला वितरण

कै. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानतर्फे (जालना) राज्य काव्य, साहित्य पुरस्कारांची घोषणा बुधवारी झाली.
Dasu Vaidya Dukhi award Indrajit Ghule Na Dho Mahanor Sahitya award to be distributed on April 9
Dasu Vaidya Dukhi award Indrajit Ghule Na Dho Mahanor Sahitya award to be distributed on April 9Sakal

Jalna News : कै. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानतर्फे (जालना) राज्य काव्य, साहित्य पुरस्कारांची घोषणा बुधवारी झाली. यामध्ये दासू वैद्य यांना दुःखी तर इंद्रजित घुले यांना ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार जाहीर झाला.

प्रसिद्ध उर्दू शायर राय हरिश्‍चंद्र साहनी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मागील २५ वर्षांपासून ‘दुःखी’ हा राज्य काव्यपुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदा मराठीतील कवी, गीतकार दासू वैद्य यांना कवितेतील समग्र योगदानासाठी या पुरस्काराची घोषणा झाली.

२५ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच कवी ना. धों. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रथमच ‘ना. धों. महानोर’ राज्य साहित्य पुरस्कार दिला जाणार आहे.

तो मान यंदा मंगळवेढ्याचे इंद्रजित घुले यांना प्राप्त झाला. पाच हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह, असे याचे स्वरूप आहे. यांचे वितरण ९ एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी ‘कवितेचा पाडवा’ या कार्यक्रमात होईल, अशी माहिती ट्रस्टचे अभय साहनी, विनीत साहनी, कवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर व पंडितराव तडेगावकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com