Beed Crime News : शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर बीडमध्ये जीवघेणा हल्ला ; उपचारासाठी दोघांना पुण्याला हलविले

शहरातील कामे आटोपून आपल्या गावी (म्हाळसजवळा, ता. बीड) निघालेल्या शिवसेना उपजिल्हाप्रमुखासह अन्य एकावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. चार) रात्री समोर आली.
Beed Crime News
Beed Crime Newssakal

बीड : शहरातील कामे आटोपून आपल्या गावी (म्हाळसजवळा, ता. बीड) निघालेल्या शिवसेना उपजिल्हाप्रमुखासह अन्य एकावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. चार) रात्री समोर आली. ज्ञानेश्वर खांडे यांच्या हात-पायावर लोखंडी रॉडने मारहाण केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. जिल्हा रुग्णालयात उपचारानंतर त्यांना पुण्याला हलविण्यात आले आहे.

ज्ञानेश्वर खांडे यांची काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून निवड झाली. दरम्यान, बुधवारी ज्ञानेश्वर खांडे व अविनाश खांडे शहरात आले होते. रात्री कामे आटोपून ते वाहनातून म्हाळसजवळा या आपल्या गावाकडे जात असताना तालुक्यातील पिंपळनेर रोडवर बाह्यवळणाजवळ ज्ञानेश्वर खांडे यांचे वाहन अडविण्यात आले.

वाहनातून उतरताच काही कळण्याच्या आत त्यांच्यावर लोखंडी हत्यारांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ज्ञानेश्वर खांडे यांचे दोन्ही पाय व दोन्ही हात फ्रॅक्चर झाले आहेत. त्यांचा मित्र अविनाश खांडेही जखमी झाला आहे. या दोघांना रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्या हाता-पायांवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. त्यांचा जबाब घेण्यासाठी बीड ग्रामीण ठाण्याचे पथकही पुण्याला गेले आहे.

Beed Crime News
Nanded Loksabha Constituency : मराठवाड्याच्या विकासाची जबाबदारी भाजपची, फडणवीस ; नांदेडला प्रताप पाटील चिखलीकर यांनी भरला अर्ज

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्यांना जिवे मारण्याची धमकी फोनवरून देण्यात आली होती. त्यांनी याबाबत पिंपळनेर पोलिसांना माहितीही दिली होती. दरम्यान, या प्रकरणी जखमींच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com