केवळ रुग्णवाहिका नसल्याने सिनेअभिनेत्री बाळांतिणीचा बाळासह मृत्यू

राजेश दारव्‍हेकर
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

घरात हसऱया वातावरणात पाळणा हलणार होता आज त्याच घरात केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्या अभागी आई-बाळाची
तिरडी उचलावी लागली.

हिंगोली - घरात पाळणा हलणार म्हणून सर्व कुटुंब आनंदात होते. प्रसूती कळा येताच तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पण, केवळ ग्रामीण भागात आरोग्य सुविधा नसल्याने तिच्यासह तिच्या नवजात बाळाचा मृ्त्यू झाला. ज्या घरात हसऱया वातावरणात पाळणा हलणार होता आज त्याच घरात केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्या अभागी आई-बाळाची
तिरडी उचलावी लागली. त्यामुळे ग्रामस्थांमधून ढिसाळ यंत्रणेबाबत रोष व्यक्त केला जात आहे. ही हृदयद्रावक घटना जिल्ह्यातील गोरेगाव (ता. सेनगाव) येथे रविवारी (ता. 21) घडली.

पूजा विष्णू झुंजार (वय 25) असे मृताचे नाव आहे. त्यांनी दोन मराठी चित्रपटा भूमिकाही केलेल्या आहेत. गोरेगाव येथील पूजा यांना प्रसूती कळा येत येताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना सल्‍याने तातडीने उपचारासाठी गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात दाखल केले. रविवारी पहाटे
दोनच्‍या सुमारास त्‍यांची प्रसूती झाली. मात्र, अवघ्या काही वेळातच बाळाचा मृत्‍यू झाला.

त्‍यानंतर श्रीमती झुंजार यांची प्रकृती खालावली. त्‍यांना अस्‍वस्‍थ वाटू लागल्‍याने त्‍यांना पुढील उपचारासाठी हिंगोली येथे नेण्याचा सल्‍ला देण्यात आला. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णवाहिका नसल्याने खासगी रुग्‍णवाहिकेचा शोध सुरू झाला. खासगी रुग्‍णवाहिकेद्वारे हिंगोली
येथे नेताना रस्त्यातच त्यांचा मृत्‍यू झाला. माता मृत्‍यू व बालमृत्‍यूच्‍या घटनेमुळे आरोग्‍य विभागात मोठी खळबळ उडाली आहे. 
 

रुग्णवाहिका मिळाली असती तर वाचले असले प्राण
श्रीमती झुंजार यांना उपचारास नेण्यासाठी तातडीने रुग्‍णवाहिका मिळाली नाही. त्‍यामुळे त्‍यांना वेळेवर उपचार मिळाले नसल्‍याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे प्राथमिक आरोग्‍य केंद्रातील रुग्‍णवाहिकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  श्रीमती झुंजार यांनी 'फाल्‍गुनराव जिंदाबाद', 'देवी माऊली आम्‍हा पावली' या चित्रपटात नायिकेची भूमिका केली होती. येथील
चित्रपट निर्माते विष्णू झुंजार यांच्‍या त्‍या पत्‍नी होत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of baby and mother at Goragaon dist Hingoli