लातूर जिल्हयात थंडीचा बळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

निलंगा  : गेल्या दोन दिवसांपासून औराद शहाजानी व परिसरात थंडीचा कडाका वाढला असल्यामुळे यंदाची नीचांकी तापमान ४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. दरम्यान निलंगा तालुक्यातील सावरी येथे रात्री शेतवस्तीवर तुरीची रास पडली होती. त्यामुळे शेतात मुक्कामास गेलेले व्यंकट बाजीराव जाधव वय ६२ वर्ष या शेतकऱ्याचा थंडीने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
 
शेत वस्तीवरील पत्र्याच्या शेडमध्ये ते झोपलेले असताना थंडीचा कडाका वाढल्यामुळे ते गारठून त्यांचा पहाटेच्या दरम्यान मृत्यू झाला. याबाबत व्यंकट जाधव यांचे नातेवाईक नरसिंग जाधव यांना विचारले असता त्यांनी व्यंकट जाधव यांचा मृत्यू थंडीने काकडून झाल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Death Due to cold in Latur district

टॅग्स