कुटुंब कल्याणची शस्त्रक्रिया झालेल्या महिलेचा मृत्यू 

योगेश पायघन
रविवार, 24 जून 2018

औरंगाबाद : मुकुंदवाडी येथील कलिंदा सुरेश लांडगे (वय 27) यांचा रविवारी (ता 24) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास राज्य कामगार विमा रुग्णालयात मृत्यू झाला. शनिवारी सकाळी अकरा वाजता त्यांची कुटुंब कल्याणची शस्त्रक्रिया झाली होती. उपचारादरम्यान हलगर्जीपणा झाल्याने मृत्य झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

रेल्वेस्टेशन एमआयडीसीतील भोगलेऑटोमोटिव्ह येथे ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या सुरेश लांडगे यांना ईएसआयएसच्या रुग्णालयाची सेवा मिळत होती. त्यामुळे त्यांनी पत्नी कालिंदा यांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यासाठी शुक्रवारी सकाळी चिकलठाणा एमआयडिसीतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात दाखल केले होते. कालिंदा यांच्यावर शनिवारी सकाळी अकरा वाजता शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना रात्री आठ वाजता खायला देण्यात आले. रविवारी सकाळी त्यांनी नाष्टा केला. त्यानंतर दुपारी साडेतीन च्या सुमारास त्यांना वार्ड 52 मध्ये चक्कर आली. त्यानंतर त्यांना स्वास घ्यायला त्रास होत असल्याने डॉक्टरांनी उपचार सुरू केले दरम्यान सहा वाजता त्यांना अचानक मृत घोषित केल्याने नातेवाईकांनी शंका उपस्थित करत डॉक्टरांना जाब विचारला. 

यावेळी डॉक्टरांनी खबदारी घेत पोलिसांना पाचारण केले होते. एमआयडीसी सिडकोचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी पंचनामा केला मात्र हलगर्जी पणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली व मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे बराच काळ रुग्णालयात तणाव होता. डॉक्टरांनी हलगर्जीपणाचा आरोप फेटाळून लावला असून केस मेडिको लीगल झाल्याने शवविच्छेदन अहवालानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश नाईक म्हणाले.

Web Title: Death of a family welfare surgery woman