तंबाखूच्या भट्टीत पडून पिता-पुत्राचा मृत्यू 

The death of the father son falls into the tobacco oven
The death of the father son falls into the tobacco oven

नांदेड: तंबाखूच्या भट्टीत पडल्याने पिता- पुत्रांचा जळून मृत्यू झाला. ही घटना चिकना (ता. धर्माबाद) येथे सोमवारी (ता. 18) दुपारी उघडकीस आली. शेख चांद पाशा खाजामिया (वय 55) व त्यांचा मुलगा वंशजचांद पाशा (वय 22) यांचा करुण अंत झाला आहे.

धर्माबाद व तेलंगना सिमावर्ती भागात तंबाखुचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. तंबाखूच्या पानांना धूर देण्याची पद्धत आहे. सदर तंबाखू परिपक्व करण्यासाठी त्याला धुरावर भाजणे गरजेचे असते. म्हणून नेहमीप्रमाणे हे पितापुत्र आपल्या शेतातील तंबाखूला धूर देण्यासाठी रविवारी (ता. 17) आपल्या शेतात गेले. दिवस संपायला येऊनही ते घरी न परतल्याने सोमवारी (ता. 18) सकाळी नातेवाईक शेताकडे गेले असता हा धक्कादायक प्रकार दिसला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. तंबाखूच्या भट्टीत त्यांचा मृतदेह आढळून आला.

दोघांचेही मृतदेह पुर्णपणे जळून खाक झाले होते. याबाबतची माहिती धर्माबाद पोलिसांना मिळताच ठाण्याचे पोलीस निरीक्षक भागवत जायभाये हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन्ही मृतदेह भट्टीतून बाहेर काढून धर्माबाद शासकिय रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक भागवत जायभाये यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com