खासगी बसच्या अपघातात एक ठार; 21 जखमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

जालना - चालकाला डुलकी लागल्याने खासगी बस उलटून झालेल्या अपघातात एकजण ठार; तर 21 प्रवासी जखमी झाले. जालना-औरंगाबाद मार्गावरील मात्रेवाडी पुलाजवळ शुक्रवारी (ता. 9) पहाटे पाच वाजता हा अपघात झाला.

जालना - चालकाला डुलकी लागल्याने खासगी बस उलटून झालेल्या अपघातात एकजण ठार; तर 21 प्रवासी जखमी झाले. जालना-औरंगाबाद मार्गावरील मात्रेवाडी पुलाजवळ शुक्रवारी (ता. 9) पहाटे पाच वाजता हा अपघात झाला.

पोलिस सूत्रांनी सांगितले, की खुराणा ट्रॅव्हल्स कंपनीची बस पुण्याहून प्रवाशांना घेऊन हिंगोलीकडे निघाली होती. पहाटे पाचच्या सुमारास मात्रेवाडी पुलाच्या अलीकडे चालकाला डुलकी लागल्यामुळे नियंत्रण सुटून बस दोन पलट्या मारून कडेला जाऊन पडली. या अपघातात बसचालक सोपान निवृत्ती डोबाडे (रा. पूर्णा) यांच्यासह बसमधील हरी तुकाराम वाडवे (वय 60, रा. उखळी, ता. वाशीम) यांचा मृत्यू झाला; तर 21 जण जखमी झाले. जखमींमध्ये पुण्यातील उज्ज्वल दशरथ हाके (25, शिवाजीनगर), केतकी रमेश वाघमारे (18), नेहा गणेश वाघमारे (5), संध्या रमेश वाघमारे (47) यांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी केतकी वाघमारे, संध्या वाघमारे, बाळासाहेब चव्हाण, रमेश घुगे, अन्नपूर्णा टुप्पड, जयश्री चव्हाण यांना औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालक डोबाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: death in private bus accident