जालन्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू

उमेश वाघमारे 
Thursday, 13 August 2020

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास तयार नाही. आतापर्यंत जिल्ह्यात १०९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात बुधवारी (ता. १२) तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर १०९ नवीन कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे

जालना - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास तयार नाही. आतापर्यंत जिल्ह्यात १०९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात बुधवारी (ता. १२) तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर १०९ नवीन कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही तीन हजार १२३ झाली आहे. दरम्यान, ३८ कोरोनाबाधित रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. परिणामी आतापर्यंत एक हजार ९०९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या एक हजार ११० जणांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने सुरू असून कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा दरही वाढता आहे. बुधवारी (ता. १२) तीन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील सिंधी बाजार येथील ५५ वर्षीय पुरुष, लक्ष्मीनारायणपुरा येथील ८० वर्षीय महिला व मंमादेवी परिसरातील ८० वर्षीय महिलेचा समावेश आहे. परिणामी या कोरोनामुळे आतापर्यंत १०४ जणांचा बळी गेला आहे.

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी तब्बल १०९ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. शहरातील भोकरदन शहरातील देशमुख गल्ली दहाजण, नूतन वसाहत येथील नऊजण, योगेशनगर येथील आठजण, दुर्गामाता रोड येथील सातजण, कंडारी येथील पाचजण, मुरमा येतील चारजण, परतूर शहरातील काझीगल्ली येथील प्रत्येकी चार, मामू दर्गा मंगळबाजार, आनंदवाडी, निऑन चौक, घनसावंगी, तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव, मंठा येथील सुगंधानगर येथील प्रत्येकी तीनजण, आष्टी (ता. परतूर), रोहिणा (खु.), भोगाव, पारध (बु., ता. भोकरदन) येथील प्रत्येकी दोनजण, तर जालना शहरातील निर्मलनगर, टाऊन हॉल, भवानीनगर, गुडलागल्ली, समर्थनगर, शाकुंतलनगर, देवी दहेगाव, परतूर शरातील मोंढा व अक्षयनगर, रामेश्वर गल्ली, पाटोदा (ता. मंठा), तळणी (ता. मंठा) वालसावंगी व धोत्रा येथील प्रत्येकी एकजण असे नव्वद जण कोरोनाबाधित झाले आहेत. तर अँटीजेन तपासणीद्वारे १९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

उपचारानंतर ३८ जण कोरोनामुक्त झाले. त्यांना मंगळवारी घरी पाठविण्यात आले. यामध्ये भोकरदन येथील १४, जालना शहरातील शंकरनगर व देऊळगावराजा येथील प्रत्येकी तीन, पाणीवेस व डबलजीन येथील प्रत्येकी दोन, जालना शहरातील लोधी मोहल्ला, जयभवानीनगर, मध्यवर्ती कारागृह, लक्ष्मीनारायणपुरा, बिहारीलालनगर, हनुमानघाट, यशवंतनगर, साईनगर, मिशन हॉस्पिटल परिसर, विद्यानगर, परतूर शहरातील शनिमंदिर परिसर, वाणढोक, सिंदखेडराजा, म्हसला येथील प्रत्येकी एकजण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत एक हजार ९०९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या एक हजार ११० कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of three corona patients in Jalna