जालन्यात कोरोनामुळे तिघांचा बळी 

संग्रहित चित्र.
संग्रहित चित्र.
Updated on

जालना -  जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे मृत्यू सुरूच आहेत. त्यातच बुधवारी (ता.१९) तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत १११ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर ४७ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल तीन हजार ८९७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, बुधवारी ५९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. परिणामी आतापर्यंत तब्बल दोन हजार ४६५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या एक हजार ३२१ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात कोरोना रुग्णांसह कोरोना बळींची संख्याही वाढत आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू थांबले होते. मात्र, बुधवारी (ता.१९) तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात शहरातील म्हाडा कॉलनी येथील ८३ वर्षीय पुरुष, गायत्रीनगर येथील ७८ वर्षीय पुरुष, जाफराबाद शहरातील आदर्शनगर येथील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत १११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान ४७ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहेत. त्यामुळे आतापर्यंत तब्बल तीन हजार ८९७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. यापैकी तब्बल दोन हजार ४६५ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

कोरोनावर मात केल्याने बुधवारी ५९ जणांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात भोकरदन तालुक्यातील फत्तेपूर येथील सहा जण, मसनापूर येथील पाचजण, बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील पाचजण, कंडारी येथील चारजण, जालना शहरातील योगेशनगर व मंठा शहर येथील प्रत्येकी तीनजण, जाफराबाद तालुक्यातील खासगाव, रोहिणा खुर्द व खादगाव येथील प्रत्येकी दोन, जालना शहरातील लक्ष्मीकांतनगर, जालना शहर, नूतन वसाहत, लोणार, समर्थनगर, माउलीनगर, वाल्मीक चौक, कालिकुर्ती, भवानीनगर, निर्मलनगर, सराफानगर, इंदेवाडी, राज्य राखीव पोलिस बल, परतूर, आष्टी (ता. परतूर), जालना तालुक्यातील शेलगाव, दरेगाव, कवठा, माहेर जळगाव, लिंगेवाडी, आरदखेडा, वरखेडा, सोमठाणा, पराडा, कोंढा येथील प्रत्येकी एक अशा एकूण ५९ रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com