अखेर सासरच्यांनी विष पाजलेल्या 'त्या' महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

सोमुर (ता.देगलूर) येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी लग्नानंतर सतत चार वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करून ता.02 जानेवारी रोजी करीत विष पाजविले होते. उपरोक्त घटनेनंतर सासरच्या पाच लोकांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मरखेल पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. घटनेनंतर विवाहितेवर उपचार सुरू असताना ता. 18 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मरखेल (नांदेड) : सोमुर (ता.देगलूर) येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी लग्नानंतर सतत चार वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करून ता.02 जानेवारी रोजी करीत विष पाजविले होते. उपरोक्त घटनेनंतर सासरच्या पाच लोकांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मरखेल पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. घटनेनंतर विवाहितेवर उपचार सुरू असताना ता. 18 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मूळ भायेगाव (ता.देगलूर) येथील सुप्रिया पृथ्वीराज पाटील (वय : 23 वर्षे) या विवाहितेचे 2015 साली सोमुर येथील पृथ्वीराज दिगंबर पाटील याच्याशी रितिरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. लग्नानंतर 05 मे 2015 पासून पती व सासरच्या अन्य लोकांनी विविध कारणांनी या विवाहितेस शारीरिक व मानसिक छळ करून प्रताडीत केले. सासरच्या लोकांत सुधारणा होईल या उद्देशाने नेहमीच्या त्रासास विवाहितेने सहन केले. दरम्यान ता.02 जानेवारी रोजी तुला काम नीट करता येत नाही. माझा मुलगा तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवत नाही म्हणून आमची बदनामी करतेस? या कारणावरून गैरसमज करून पृथ्वीराज दिगंबर पाटील (पती), मिनाबाई दिगंबर पाटील (सासू), प्रीती दिगंबर पाटील (नणंद), दिगंबर पाटील (सासरा), छानुबाई बिरादार (सासूची मैत्रीण) या लोकांनी शिवीगाळ करून मारहाण केली. नवरा व सासू या दोघांनी जबरदस्तीने तोंडात विष घातल्याचे पोलीसांसमोर दिलेल्या जबाणीत या विवाहितेने सांगितले होते. त्यानुसार मरखेल पोलिसांत उपरोक्त लोकांवर जीवे मारण्याचा प्रयत्न व छळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता.

दरम्यान, या घटनेनंतर सुप्रिया पाटील यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असताना ता.18 रोजी सकाळी अकराच्या सुमारास प्राणज्योत मालवली. देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सूरू होती. याप्रकरणी विवाहितेचा जबाब हा स्थानिक पोलिसांसह खुद्द न्यायाधीशांनी घेतल्याचे समजते. उपरोक्त दोन्ही जबाबांच्या आधार व तथ्य तपासून गुन्ह्यात फेरबदल करणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Web Title: The death of the woman poisoned her husband family