मेंदू ज्वराने तरुणीचा मृत्यु 

मेंदू ज्वराने तरुणीचा मृत्यु 

नांदेड : तरोडा परिसरातील विजयनगर येथील रहिवाशी पुजा वाघमारे (20 वर्ष) या तरुणीला विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन दिवसापूर्वी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान शनिवारी (ता.3) सकाळी नऊच्या दरम्यान तीचा मृत्यु झाला.

पुजाला गुरुवारी (ता.31) विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु ताप जास्त असल्याने तीला आतिदक्षता विभागात दाखल करण्याचे सागण्यात आले होते. परंतु, अतिदक्षता विभागातील सर्वच बेड फुल असल्याने व सिटी स्कॅन मशीन बंद असल्याने नातावाईकांनी पुजाला घेवून खासगी रुग्णालयात जाऊन सिटी स्कॅन करुन घ्यावे लागले. या दरम्यान त्यांचा जास्त वेळ गेला. गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास तीला आतिदक्षता विभागात दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले होते. या दरम्यान झालेल्या विलंबामुळेच तीच्यावर मृत्युचा प्रसंग ओढवला असल्याची परिवाराकडून खंत व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com