उस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी दीपा मुधोळ-मुंडे

प्रकाश बनकर
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

औरंगाबाद : नाशिक महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची बदली झाली. तर त्यांच्या जागेवर जिल्हाधिकारी म्हणून औरंगाबाद जीएसटीच्या राज्य कर सहआयुक्‍त दीपा मुधोळ-मुंडे यांची वर्णी लागली आहे. मंगळवारी (ता.4) त्यांना बदलीचे पत्र मिळाले असून, लवकरच रुजू होणार असल्याची माहिती दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली.

दीपा मुधोळ यांनी 24 एप्रिल 2017 ला जीएसटीच्या राज्यकर सहआयुक्‍तपदी पदभार स्वीकारला. यानंतर देशभरात वस्तू आणि सेवाकर लागू करण्यात आला. जीएसटीची औरंगाबाद विभागात अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. जीएसटी काय आहे हे कर्मचाऱ्यांना नीट समवून सांगत ते व्यापाऱ्यांना पटवून देत जीएसटीत नोंदणीचे कामही केले. यासह त्यांनी पदभार घेतल्यानंतर जीएसटीचा महसूलात मोठी वाढ झाली. जीएसटी कर न भरणाऱ्यांवर त्यांनी जप्तीची कारवाई केली. यातूनही मोठा महसूल विभागास मिळाला.

त्यानंतर आलेल्या ई-वे बिलाची प्रभावीपणे अंमलबाजावणी करण्यात आली. यात ई-वे बिल न बनविणाऱ्यांवरही जोरदार करावाई त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यातून कोट्यावधींचा महसूल जीएसटीला मिळाला. त्यांच्या या दीड वर्षाच्या कालवधीत जीएसटीतील अनेक बदल व्यापारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वीकारले.

औरंगाबादेत येण्यापूर्वी दीपा मुधोळ-मुंडे या बुलडाणाच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. त्या काळतही स्त्रीभ्रूणहत्या त्यांनी जिल्ह्यातील कमी केल्या. यासह शिक्षण, आरोग्य क्षेत्रात त्यांचे मोठे काम होते. यामुळे त्यांना मुख्यमंत्री पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या रुपाने उस्मानाबाद जिल्ह्याला महिला जिल्हाधिकारी लाभणार आहे. 

Web Title: Deepa Mudhol Munde as Osmanabad District Collector