दीपक कोनाळे सर करणार आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर

सुशांत सांगवे 
सोमवार, 2 जुलै 2018

लातूर - आफ्रिकेतील टांझानिया देशात किलीमांजारो हे शिखर असून याची उंची समुद्र सपाटीपासून 19 हजार 341 फूट आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी हे शिखर सर करून त्यावर भारताचे राष्ट्रगीत सादर करत विश्वविक्रम केला होता. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयारी करत असलेला लातूरमधील युवा गिर्यारोहक दीपक कोनाळे हा शिखर सर करून इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे.

एव्हरेस्टवीर विश्वविक्रमवीर आनंद बनसोडे, गिर्यारोहक बालाजी जाधव आणि निखिल यादव, सागर भारती यांनी स्थापन केलेल्या 360 एक्सप्लोर ग्रुपद्वारे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखराची मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत दीपक कोनाळे आणि तेलंगणा राज्यातील तुकाराम अमगोध हे दोघे या पुण्यातून रविवारी (ता. १) या मोहिमेवर निघाले आहेत. भारताचा सर्वात मोठा तिरंगा आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर नेहून ते विश्वविक्रम करण्याचे लक्ष त्यांनी समोर ठेवले आहे.

दीपक हा मुळचा लातूरचा असून त्याने वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली आहे. लहानपणापासून त्याला या क्षेत्राची आवड आहे. ती वाढविण्यासाठी त्याने बनसोडे यांच्याकडे धडे घेतले. त्यांच्या या मोहिमेला गिर्यारोहण क्षेत्रातील एव्हरेस्टमेकर सुरेंद्र शेळके, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त रोहिदास कोंडे, प्रशांत कोंडे यांनी फ्लॅग ऑफ केला. आठ दिवसात ही मोहिम फत्ते होईल, असे बनसोडे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

‘‘गुरुवर्य सुरेंद्र शेळके, एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्यामुळे माझे स्वप्न पूर्ण होत आहे. अनेक दिवसांपासून या मोहिमेची प्रतीक्षा करत होतो. भारताचा सर्वोच्च तिरंगा आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जात आहे, याचा खूप अभिमान वाटत आहे.’’ 
- दीपक कोनाळे

Web Title: Deepak Konale will trek on africa's highest mountain