Leopard Movement Raises Alarm in Degloor Taluka
देगलूर : गेल्या कांही दिवसापासून तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .गेल्या आठवड्यात तालुक्यातल्या नंदुर, कोटेकलुर, लिंबा, आलुर शिवारात शेतात काम करणाऱ्या महिलांना बिबट्या दिसून आला. त्यामुळे कांही महिला त्याला बघताच जागीच कोसळल्या, त्यानंतर तो शेवाळा परिसरात आल्याची चर्चा झाली, दुपारनंतर शेतात काम करणाऱ्या मजुरानी गावाकडे धूम ठोकली.