Degalur Market Committee: 'देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जमीन विक्रीला हिरवा कंदील'; पणनमंत्र्यांनी दिली होती स्थगिती, मंत्रालयात पुन्हा सुनावणी

Minister’s Stay Lifted: न्यायालयात दाद मागितल्याने न्यायालयाने ही बाजार समितीला जमीन विक्री प्रकरणी दिलेली स्थगीती उठवण्याचे निर्देश दिल्याने राज्याच्या सहकार व पणन विभागाच्या अवर सचिवांनी स्थगिती उठवण्यात येत असल्याचे पत्र नुकतेच बाजार समितीला प्राप्त झाल्याने जमीन विक्री प्रकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Deglur APMC land sale gets green signal after Mantralaya hearing; minister’s stay vacated.

Deglur APMC land sale gets green signal after Mantralaya hearing; minister’s stay vacated.

eSakal

Updated on

-अनिल कदम

देगलूर : देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासकामे व कर्मचाऱ्यांचे देय थकित वेतन अदा करण्याच्या उद्देशाने विद्यमान संचालक मंडळाने बाजार समितीच्या मालकीची ३२ आर .जमीन विक्री करण्याचा प्रस्ताव पणन संचालकाकडे दिला होता. मात्र त्याला आक्षेप घेत खा. डॉ. अजित गोपछडे यांनी जमीन विक्रीला परवानगी देऊ नये असे पत्र पणन मंत्र्यांना दिल्याने त्यांनी या प्रकरणाला स्थगिती दिली होती. याप्रकरणी विद्यमान संचालक मंडळाने न्यायालयात दाद मागितल्याने न्यायालयाने ही बाजार समितीला जमीन विक्री प्रकरणी दिलेली स्थगीती उठवण्याचे निर्देश दिल्याने राज्याच्या सहकार व पणन विभागाच्या अवर सचिवांनी स्थगिती उठवण्यात येत असल्याचे पत्र नुकतेच बाजार समितीला प्राप्त झाल्याने जमीन विक्री प्रकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळात आनंदाचे वातावरण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com