
परभणी ः शहरातील ‘एमआयडीसी’ भागात सापडलेल्या कोरोना बाधीत रुग्णामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेली एक महिला शहरातील काही घरामध्ये कामासाठी जाते. त्यामुळे अशी २५ ते ३० कुटूंबे सध्या प्रचंड हादरली आहेत. त्यापैकी जवळपास कुटूंबांनी गुरुवारी (ता.१६) जिल्हा रुग्णालयात धाव घेवून आमची तपासणी करा, अशी आग्रही मागणी केल्याने रुग्णालय प्रशासनासमोर अचानक कामाचा व्याप वाढला.
परभणी जिल्हा हा गुरुवार सकाळपर्यंत ‘ग्रीन झोन’ मध्ये होता. प्रशासनाच्या सुनियोजनामुळेच हा मोठा पल्ला जिल्ह्याने पार केला होता. पंरतु, शेजारच्या जिल्ह्यातून परभणीत राहणाऱ्या बहिणीकडे केवळ उपचारासाठी आलेला तो रुग्ण चक्क पॉझीटिव्ह निघाल्याने खळबळ उडाली.
महिला वेगवेगळ्या कॉलन्यांमध्ये घरकामासाठी जात होती
पॉझीटिव्ह रुग्ण त्याच्या बहिणीच्या व इतर चार व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्या पाच जणांना रुग्णालयात कॉरंन्टाईन करण्यात आले आहे. या पाचमध्ये एक महिला शहरातील वेगवेगळ्या कॉलन्यांमध्ये घरकामासाठी जात होती. त्यामुळे ज्या घरात ती काम करत होती, त्या घरातील सदस्यांमध्ये घबराहट पसरली आहे. अशी एक दोन नव्हे तर तब्बल २५ ते ३० कुटूंब आहेत. या सर्व कुटूंबात वयोवृध्द व लहान मुलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या लोकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. यातील बहुतांश कुटूंबियांनी घरातील सर्व सदस्यांसह गुरुवारी (ता.१६) जिल्हा रुग्णालय गाठून आमची ही तपासणी करावी, अशी मागणी रुग्णालय प्रशासनाकडे केली. तपासणीसाठी आलेल्या नागरिकांमुळे रुग्णालयातील कामावर देखील अतिरिक्त ताण आला होता.
एकाच दिवशी तपासावी लागतात तीनशे रुग्ण
कोरोनाची दहशत लोकांच्या मनात ऐवढी बसली आहे, की थोडे जरी लक्षणे दिसली तरी लोक रुग्णालयात धाव घेत आहेत. नुकतेच रुग्णालयात १६ नवीन डॉक्टरांची पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यात आली आहेत. या नवीन डॉक्टरांकडे जनरल तपासणीची जबाबदारी देण्यात आली आहे. या संदर्भात एका नवनियुक्त डॉक्टराने सांगितले, दिवसभरात २०० ते ३०० रुग्ण तपासावे लागत आहेत. लोकांना सर्दी झाली तरी लोक घाबरून दवाखान्यात येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.