शब्दांशी खेळ नको, सरसकट दुष्काळ जाहीर करा : शरद पवार 

राजेभाऊ मोगल 
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यातील काही जिल्ह्यातील स्थिती गंभीर आहे. अशावेळी लहानमुलांसारखे "दुष्काळसदृष्य परिस्थिति" अशी विधाने करीत शब्दांशी न खेळता सरसकट दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी (ता. 25) येथे पत्रकार परिषदेत केली. माणसांसोबतच पशुधन जगले पाहीजे, यासाठी आपण राज्य, केंद्र सरकारची भेट घेणार आहोत, असेही स्पष्ट केले. 

बुलडाणा येथे माजी मंत्री बोंद्रे यांच्या कार्यक्रमासाठी श्री. पवार बुधवारीच येथील दौऱ्यावर आले होते. दुष्काळीस्थिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत घेतली. ते म्हणाले, बुलडाणा येथे जाण्याचा एक हेतू हा लोकांशी संवाद साधता येईल, आजूबाजूची परिस्थिती पाहता येईल हा देखील होता. अनेक ठिकाणी एका विहीरीवर 40 -40 महिला पाण्यासाठी थांबलेल्या बघायला मिळत आहेत. जर सध्याच ही स्थिती आहे तर आणखी सहा ते सात महिन्यांनी अतिशय गंभीर स्थिती असेल, याचा विचार करायला हवा. मी, अनेक दुष्काळ बघीतले. अहवाल, पैसेवारी यांचा विचार न करता आम्ही निर्णय घेत त्याची अंमलबजावणी केली. त्यामुळे पैसेवारी, अहवाल, केंद्र सरकारची टिम बोलावण्याची गरज नाही. सरकारने गांभीर्य लक्षात घेवून निर्णय घ्यावा. समाज संकटात असताना राजकारण करू नये. परिस्थिती जाणून न घेतल्याचे हे लक्षण असल्याचा टोला त्यांनी लगावला.

Web Title: demand to government for declaring drought in state by sharad pawar