इष्टलिंग पूजा करत स्वतंत्र धर्माची मागणी

सुशांत सांगवे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

लातूर: पहिल्या श्रावणी सोमवारचे मुहूर्त साधत लिंगायत समाजातील शेकडो बांधव तहसील कार्यालयासमोर एकत्र आले. इष्टलिंग पूजा करत अन्‌ मंत्रोच्चार म्हणत लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची आणि अल्पसंख्यांक दर्जा मिळण्याची मागणी केली. सरकाला बेल, फुले अर्पण करत गांधीगिरी मार्गाने केलेले हे आंदोलन चर्चेचा विषय ठरले.

निलंगा येथे नुकत्याच झालेल्या लिंगायत धर्म संमेलनात इष्टलिंग पूजा आंदोलनाची घोषणा शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी केली होती. त्यानूसार पहिल्या श्रावणी सोमवारचे मुहूर्त साधत लिंगायत समाजातील बांधवांनी हे आंदोलन केले. 'एक लिंगायत कोटी लिंगायत', 'हर हर महादेव', 'आमची मागणी पूर्ण झालीच पाहीजे', 'आम्हाला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळालाच पाहीजे'... अशा विविध घोषणा यावेळी घुमत होत्या.

लिंगायत स्वतंत्र धर्म संविधानिक मान्यता व अल्पसंख्यांक दर्जा द्या, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ निर्माण करा, मंगळवेढा (जि. सोलापूर) येथे महात्मा बसवेश्वर स्मारक निर्माण करा, लिंगायत धर्मीयांची स्वतंत्र जनगणना करा, लिंगायतांच्यासाठी गाव तिथे स्मशानभूमी आणि वसतिगृहे विकसित करा, लिंगायत विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात पन्नास टक्के सुट द्या आणि शिष्यवृत्ती द्या... अशा विविध मागण्या लिंगायत बांधवांच्या वतीने करण्यात आल्या.

Web Title: demand for independent religion is worshiped by Iingayat community