लिंगायत समाजाच्या मागण्यासाठी औसा कडकडीत बंद

जलील पठाण
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

औसा - लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी (ता. २४) औसा बंदची हाक देण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी गांधी चौकातून लिंगायत समाजाचा मोर्चा मुख्य मार्गाने अप्रोच चौकात आल्यावर महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तेथून मोर्चेकरी तहसील कार्यालयासमोर येऊन आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

गुरुवारी सकाळपासूनच शहरातील व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन ध्वनिक्षेपकवरून करण्यात आले होते. लिंगायत समाजाच्या प्रलंबित मागण्या संदर्भात शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शुक्रवारी गांधी चौकातून मुख्य मार्गाने निघालेल्या मोर्च्यात शेकडो लोक सहभागी झाले होते. हा मोर्चा मुख्य मार्गाने बसस्थानक, तहसील कार्यालय मार्गे महामार्गावरील प्रॉच रोड चौकात आल्यावर मोर्चेकऱ्यांनी चौकात रस्त्यावर ठिय्या मांडला. थोड्या वेळाने हा मोर्चा परत तहसील कार्यालयात आल्यावर लिंगायत समाजाच्या विविध मागण्याचे निवेदन तहसीलदाराना देण्यात आले. शहरातील सर्व दुकाने, हॉटेल्स आणि पान टपऱ्या कडेकोट बंद होत्या. तुरळक वाहतूक सोडली तर सर्वत्र बंदचा परिणाम जाणवत होता. रस्त्यावर ठिय्या मांडलेल्या मोर्चेकऱ्यांनी वाहतुकीस कोणताही अडथळा न आल्यामुळे महामार्गावरची वाहतुक सुरळीत होती.

किल्लारीतही बंद आणि रास्ता रोको
तालुक्यातील किल्लारीतही लिंगायत समाजाकडून बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे किल्लारी गावही कडकडीत बंद करून मागण्या संदर्भात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्थ ठेवण्यात आला होता. दुपारपर्यंत शहर आणि किल्लारीतील सर्व दुकाने मेडिकल आणि दवाखाने वगळता बंद होती.

Web Title: For the demand of the Lingayat community band in ausa