लातूर आरोग्य परिमंडळामध्ये बीडचा दंत विभाग अव्वल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

बीड - लातूर आरोग्य परिमंडळामध्ये बीड, लातूर, उस्मानाबाद व नांदेड या चार जिल्ह्यांचा समावेश होतो. जिल्ह्यातील सर्व जिल्हा रुग्णालये व अधिनस्त असलेले उपजिल्हा, स्त्री, ग्रामीण रुग्णालयाच्या तुलनेमध्ये जिल्हा रुग्णालय, बीड येथील दंत विभागाने चालू वर्षात 33 हजार 528 रुग्णांना दंतविषयक आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्याने बीडच्या रुग्णालयातील दंत विभाग लातूर परिमंडळात यावर्षी अव्वल ठरला आहे. 

जिल्हा रुग्णालयातील दंत विभागात यावर्षी 470 रुग्णांवर दंतनलिका, 254 रुग्णांवर दंत भरण, 790 रुग्णांवर दंत पर्यवेष्टन उपचार, 577 रुग्णांचे दंत उत्पाटन व 21 रुग्णांवर कृत्रिम दंतोपचार करण्यात आले आहेत. रुग्णांना यशस्वीपणे उपचार करण्यासाठी रुग्णालयाचे ज्येष्ठ दंत शल्यचिकित्सक डॉ. सत्येंद्र दबडगावकर यांच्या नेतृत्वाखाली दंत विभागातील डॉ. सबा सय्यद, गंगाधर वाहूळ, सीमा पाटील, श्रीकांत उजगरे, सुशीला नखाते यांनी पुढाकार घेतला. रुग्णालयातील दंत विभागाचे काम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. दंत विभागामार्फत भविष्यात "स्वच्छ मुख अभियान'अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करून विभागामार्फत कार्यरत सर्व अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची मौखिक आरोग्य तपासणी चालू आहे. याशिवाय सातत्याने दंत प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिरे जिल्ह्यात विविध ठिकाणी राबविण्यात येत आहेत. बीड शहरातील विविध शाळेमध्ये योग्य ब्रशिंग पद्धतीसाठी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे, असे बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांनी कळविले आहे.

Web Title: Department of Health Dental Latur