esakal | कृषी विभागाच्या धाडीत 77 पाकिटे बोगस कांदा बियाणे जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

beed

कृषी विभागाच्या धाडीत 77 पाकिटे बोगस कांदा बियाणे जप्त

sakal_logo
By
अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी (बीड): पंचगंगा बियाणे कंपनीच्या कांदा बियाणाच्या पाकिटाशी साधर्म्य साधणारे कांद्याचे बोगस बियाणे विक्रीसाठी ठेवणाऱ्या कृषी केंद्रावर कृषी विभागाने धाड टाकून 77 पाकिटे हस्तगत केली. शनिवारी (ता. 19) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कडा येथील धामणगाव रस्त्यावरील गजानन कृषि सेवा केंद्रावर ही कारवाई करण्यात आली.

तालुक्यात कांद्याच्या बोगस बियाणांची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डी.जी. मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी एस.जी. गरांडे, मंडळ कृषी अधिकारी गोरख तरटे यांच्यासह पंचगंगा बियाणे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास कडा येथील गजानन कृषि सेवा केंद्रावर अचानक धाड टाकली. या वेळी दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवलेली पंचगंगा कंपनीच्या पाकीटांशी मिळतीजुळती 77 कांदा बियाणांची पाकिटे आढळून आली.

हेही वाचा: दिलासादायक! जालन्यात कोरोना रुग्णसंख्या घटली

बोगस कांदा बियाणांची ही पाकिटे ताब्यात घेऊन कृषी विभागाने ती पोलिसांकडे सुपूर्द केली असून रात्री उशिरापर्यंत पंचगंगा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून केंद्र संचालक गणेश तागड याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

loading image