देवणीत तापमानाने ओलांडले ४२ अंश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

लातूर/देवणी - तुम्ही घराबाहेर पडताय? थोडं थांबा. शहरातील आणि जिल्ह्यातील तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. देवणीत ४२.५, औशात ४१.२ तर लातुरात ४१ अंश सेल्सियस इतक्‍या तापमानाची नोंद झाली आहे. पुढील आठवडभर उन्हाचा चटका असाच कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून स्वत:चा बचाव करावा.

आधी अवकाळी पावसाचा फटका लातूरकरांना बसला. आता उन्हाचा चटका सहन करण्याची वेळ आली आहे. गेल्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. शहरातील शनिवारपर्यंत तापमान ४० अंश सेल्सियसपर्यंत होते. ते आता ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाऊन पोचले आहे.

पुढील आठवडाभर तापमान ४१ अंश सेल्सियस राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे उष्माघातापासून बचाव करण्यासाठी दुपारच्या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

लातूर जिल्ह्यातील यंदाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद देवणी येथे झाली आहे. येथील तापमान ४२.५ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोचले आहे. दुपारच्या वेळेत अंगाची लाही-लाही होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढलेल्या तापमानाचा फटका सर्वच घटकांना बसला असून भाजीपाला, बागायती पिके करपत असल्याचे चित्र आहे. ऊस, केळी, पपई ही पिके वाढत्या तापमानामुळे करपत असल्याचे चित्र आहे. लातुरातही दुपारच्या वेळेत मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट आहे. बाजारपेठांमध्येही अशीच स्थिती आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी काहीजण रुमाल, गॉगल, टोपी वापरताना दिसत आहेत.

अशी घ्या काळजी
  उन्हात शक्‍यतो बाहेर पडू नका.
  बाहेर जाताना छत्री, रुमाल, स्कार्फ जवळ बाळगा.
  उकळलेले किंवा शुद्ध असलेले पाणी भरपूर प्या.
  फळांचा रस, उसाचा रस, ताक प्या.
  बाहेर जाताना जवळ पाण्याची बाटली ठेवा.
  सुती किंवा जाळीदार कपड्यांचा वापर करा.
  लहान मुलांना उन्हात फिरायला घेऊन जाऊ नका.

असे आहे तापमान (अंश सेल्सियसमध्ये)
  देवणी     :     ४२.५
  जळकोट     ः     ४२
  औसा     :     ४१.२
  उदगीर     :     ४१.२
  लातूर     :     ४१
  अहमदपूर     ः     ४१
  चाकूर     ः     ४१
  किल्लारी     :     ४०
  निलंगा     ः     ३९
  मदनसुरी     :     ३९
  तांदुळजा     :     ३९

Web Title: devani temperature increase summer