Devendra Fadnavis : 'मेटेंचं कार्य पुढे नेण्यासाठी आमचा पाठिंबा' फडणविसांनी ज्योती मेटेंना दिलं आश्वासन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : 'मेटेंचं कार्य पुढे नेण्यासाठी आमचा पाठिंबा' फडणविसांनी ज्योती मेटेंना दिलं आश्वासन

आज शिवसंग्रामचा व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर गेले होते. विनायक मेटे यांनी 2015 साली ही संकल्पना मांडली आहे. विनायक मेटे यांच्या निधनानंतर या व्यसनमुक्ती जनजागृती संकल्पनेत खंड पडू नये म्हणून त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी हा कार्यक्रम सुरू ठेवला आहे.

या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विनायक मेटे यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत समाजाची सेवा केली. 24 तास सामाजिक कार्य त्यांच्या मनात राहायचं. ते कायमच समाजासाठी उपक्रम करत असायचे. यामध्ये मराठा आरक्षण असो किंवा शिवरायांच्या स्मारकाचा विषय असो हे त्यांच्या मनातले विषय होते.

हेही वाचा: Year Ender 2022 : मुलायमसिंग यादव ते विनायक मेटे; या 5 नेत्यांनी सरत्या वर्षात सोडली साथ

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विनायक मेटे यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्या मागे उभा राहू असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ज्योती मेटे यांना मदतीच आश्वासनही दिलं आहे. त्याचबरोबर व्यसनमुक्ती करणे गरजेचे आहे. तरुणांना व्यसनापासून दूर करणे आवश्यक आहे असं मतही फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा: Urfi Javed : 'श्शीSSS...'; उर्फी जावेद अन् तिच्या अतरंगी स्टाईलवर भडकल्या चित्रा वाघ!