फडणवीस, गडकरींचा गुरुवारी बीड जिल्हा दौरा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

बीड - रस्तेकामांचे लोकार्पण व नवीन कामांच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी (ता. 19) बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून जिल्ह्यात 729 किलोमीटर लांबीच्या व सहा हजार 42 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी चार हजार 587 कोटी 54 लाखांच्या राष्ट्रीय महामार्ग व रस्ते महामार्ग रुंदीकरण प्रकल्पाचे लोकार्पण, कोनशिला अनावरण होणार आहे. वाघाळा (ता. अंबाजोगाई) येथे दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम होईल. पालकमंत्री पंकजा मुंडे याही उपस्थित राहणार आहेत.
Web Title: devendra fadnavis nitin gadkari beed district tour