CM Devendra Fadnavis
sakal
मराठवाडा
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ, नेमकं काय घडलं ?
OBC Reservation Protest : पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. अशी हुल्लडबाजी करणे हुतात्म्यांचा अपमान आहे असे फडणवीस म्हणाले.
Summary
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
कार्यकर्त्यांनी हैद्राबाद गॅझेटियर रद्द करण्याची मागणी करत "ओबीसींवर अन्याय होत आहे" असा आरोप केला.
पोलिसांनी तिघा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून, फडणवीस यांनी अशा हुल्लडबाजीला हुतात्म्यांचा अपमान म्हटले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात भाषण करत असताना ओबीसी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. हैद्राबाद गॅझेट विरोधात घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असतानाच अचानक काही लोक उठले आणि घोषणाबाजी सुरु केली.