'मेगाभरती'वर मुख्यमंत्री म्हणाले, उमेदवारी देण्यासारखे चारच जण

हरी तुगावकर
रविवार, 1 सप्टेंबर 2019

भाजप आणि शिवसेना स्वतंत्र पक्ष आहेत. त्यामुळे पक्षात कोणाला घ्यायचे ते स्वतः ठरवत आहेत. छगन भुजबळांना घ्यायचे की नाही ते शिवसेने ठरवायचे आहे, असे फडणवीस म्हणाले.

लातूर : आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासारख्या केवळ चार पाच लोकांनाच घेतले आहे. आणखी चार पाच लोक घेणार आहोत. भरती सुरुच राहिल पण उमेदवारी नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

महाजनादेश यात्रेनिमित्त येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मेगाभरतीमुळे भाजपसमोर आव्हान निर्माण होत आहेत का? यावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. मेगभरती हे नाव पडले आहे. पण ही मेगा भरती नाही. आतापर्यंत केवळ आम्ही चार जण घेतले आहेत. आणखी चार पाच जण घेतले जाणार आहेत. जे उमेदवारी देण्यासारखे आहेत. ही भरती सुरुच राहिल. पण उमेदवारी नाही. आम्ही फक्त दोन टक्के लोक घेतले आहेत. ९८ टक्के भारतीय जनता पक्षच आहे. पक्षाची शक्ती वाढू लागल्याने अनेक जण येत आहेत. पक्ष म्हणून शक्ती संचय केलाच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजप आणि शिवसेना स्वतंत्र पक्ष आहेत. त्यामुळे पक्षात कोणाला घ्यायचे ते स्वतः ठरवत आहेत. छगन भुजबळांना घ्यायचे की नाही ते शिवसेने ठरवायचे आहे, असे फडणवीस म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis talked about opposition leaders incoming