esakal | पंकजा मुंडेंची अतिवृष्टीच्या मदतीवरुन धनंजय मुंडेंवर टीका, म्हणाल्या.. | Pankaja Munde Beed
sakal

बोलून बातमी शोधा

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे

पंकजा मुंडेंची अतिवृष्टीच्या मदतीवरुन धनंजय मुंडेंवर टीका, म्हणाल्या..

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बीड - पालकमंत्री जिल्हा वाऱ्यावर सोडून पुण्याला रवाना झाले, असा टोला पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना लगावून जिल्ह्याच्या मदतीचे काय, असा प्रश्न भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी माध्यमांना बोलताना उपस्थित केला. मदतीच्या आश्वासनाचे काय? मुख्यमंत्री नक्की मदत करतील. शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. केंद्राची मदत येईलच. सारखे एकमेकांना बोट दाखवणे योग्य नाही. मी जेव्हा खुर्चीवर होते तेव्हा लोकांसाठी काम केले असल्याचे मुंडे यांनी सांगितले. मुंडे म्हणाल्या, की जलयुक्त शिवार योजना ही सकारात्मक योजना होती. त्यातून सर्व ठिकाणी चुकीची कामे झालेली नाहीत.

हेही वाचा: वाळूजजवळ ट्रॅव्हल बस-ट्रकचा भीषण अपघात, आठ प्रवासी जखमी

शेतकऱ्यांच्या पाठीमागे राज्य शासनाने उभे राहिले पाहिजे. मी स्वतः बांधावर गेले आहे. पिकांची नुकसान भरपाई द्यायला हवी. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षांत एक नवा पैसा आलेला नाही, अशी टीका पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे.

loading image
go to top