औरंगाबाद - राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी कारखान्यासाठी घेतलेल्या जमिनीच्या मोबदल्यापोटी शेतकऱ्याला दिलेला ४० लाख रुपयांचा धनादेश न वटल्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. प्रकरणी डिसेंबर महिन्यात आमदार मुंडेंवर दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शासनातर्फे खंडपीठात देण्यात आली.
शेतकरी मुंजा किसनराव गीते यांची तीन हेक्टर १२ आर जमीन पूस (ता. अंबाजोगाई) येथील जगमित्र साखर कारखाना उभारणीसाठी घेण्यात आली होती. ५० लाखांत घेण्यात आलेल्या या जमिनीचे खरेदीखत करण्यात आले. ठरल्याप्रमाणे प्रथम एक लाख व नंतर सात लाख ८१ हजार २५० रुपयांचा धनादेश देण्यात आला. नंतर आमदार मुंडे यांनी परळीच्या बॅंक ऑफ महाराष्ट्रचा ४० लाख रुपयांचा धनादेश गीते यांना दिला. हा धनादेश न वटताच परत आला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.