अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंची ग्रामपंचायतींच्या निकालानंतर पहिली प्रतिक्रिया... ; आरोपांचा मतदारांवर परिणाम नाही

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 19 January 2021

रेवलीमध्ये एका जागेसाठी मतदान झाले होते त्यात अपक्ष उमेदवाराने विजय मिळविला आहे

मुंबई/परळी: मागील काही दिवसांपासून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे चर्चेत आहेत. मुंडे यांच्यावर रेणू शर्माच्या बलात्काराच्या आरोपाने बीडसह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. दुसरीकडे बलात्काराचे आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपाने राज्यातील बऱ्याच ठिकाणी आंदोलन केलं होतं.

बलात्काराच्या आरोपानं मुंडे यांचं राजकीय करिअर चांगलंच धोक्यात आलं होतं. सर्व आरोप ग्रामपंचायत निवडणूकांच्या काही दिवसांआधीच झाल्याने याचा परिणाम परळीतील ग्रामपंचायतींवर दिसणार का, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. पण सोमवारी लागलेल्या ग्रामपंचायतीच्या निकालावरुन धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांचा मतदारांवर काहीही परिणाम दिसला नाही. कारण परळीतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झाला आहे.

उदगीरमध्ये युवक उमेदवारांना मतदारांची पसंती; ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का | eSakal

परळीतील ६ ग्रामपंचायतींपैकी पाच ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला दणदणीत विजय मिळाला आहे. ग्रामपंचायतीमधील या विजयानंतर धनंजय मुंडे यांनी ट्विट करत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारांचे अभिनंदन केलं आहे. '12 पैकी 10 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे, सर्व उमेदवारंचं अभिनंदन!' अशा आशयाचं ट्विट केलं आहे. 

औसा तालुक्यातील ग्रामपंचायतींना मिळणार नवे कारभारी; प्रस्थापितांना मतदारांनी दिला झोला | eSakal

परळी तालुक्यामधील लाडझरी, रेवली, मोहा, सर्फराजपूर , भोपळा, गडदेवाडी, या ग्रामपंचायतींच्या 42 जागेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झालं होतं. यामधील लाडझरी, सर्फराजपुर, गडदे वाडी, येथे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल ला यश मिळाले आहे. तर मोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेस -भाजप पुरस्कृत पॅनल विजय मिळाला आहे.

रेवलीमध्ये एका जागेसाठी मतदान झाले होते त्यात अपक्ष उमेदवाराने विजय मिळविला आहे. तसेच वंजारवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. ब्लॅंकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे असे नमूद केले आहे

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhananjay munde parali gram panchayat election result beed political news